अपघात रोखण्यासाठी बहिर्वक्र आरसे

अपघात रोखण्यासाठी बहिर्वक्र आरसे

swt१०१५.jpg
९४८६४
सावंतवाडी : शहरात बसविण्यात आलेल्या बहिर्वक्र आरशाच्या लोकापर्ण प्रसंगी संजू परब, विशाल परब, तेजस माने व अन्य (छायाचित्रः रुपेश हिराप)

अपघात रोखण्यासाठी बहिर्वक्र आरसे
सावंतवाडीत लोकार्पणः भाजप, विशाल सेवा फाउंडेशनचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १०ः शहरातील अपघात रोखण्यासाठी विशाल सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून भाजप युवा नेते विशाल परब यांनी बहिर्वक्र आरसे बसवून केलेला सामाजिक उपक्रम स्तुत्य आहे, असे गौरवोद्गार माजी नगराध्यक्ष तथा भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी काढले.
विशाल सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून विशाल परब यांनी शहरात तब्बल २० ठिकाणी अपघात न होण्यासाठी बहिर्वक्र आरसे बसविले आहेत. शहरातील शिवराम राजे पुतळ्यानजीक बसविण्यात आलेल्या बहिर्वक्र आरशाचे लोकार्पण माजी नगराध्यक्ष परब यांच्या हस्ते आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आले.
यावेळी विशाल परब यांच्यासह माजी नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, दीपाली भालेकर, शहर उपाध्यक्ष दिलीप भालेकर, चराठा उपसरपंच अमित परब, तेजस माने, जितेंद्र गावकर, विनोद सावंत, अनिल सावंत आदी उपस्थित होते. श्री. परब पुढे म्हणाले, "शहरात बऱ्याच ठिकाणी अपघातप्रवण ठिकाणे आहेत. या ठिकाणी समोरून येणारी वाहने दिसत नसल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. हे अपघात होऊ नयेत, यासाठी बहिर्वक्र आरशाची गरज होती. ही गरज विशाल सेवा फाउंडेशनने ओळखून ती पूर्ण करण्यात आली. हा उपक्रम स्तुत्य असून भविष्यातही त्यांनी असे समाजकार्य पुढे सुरू ठेवावे."
फाउंडेशनचे परब म्हणाले, "शहरातील शालेय मुलांसाठी तसेच महिला दुचाकीस्वारांमधून अपघाताच्या ठिकाणी वाहने चालविताना भीती व्यक्त केली जात होती. शिवाय अपघातांचे प्रमाणही वाढले होते. बहिर्वक्र आरसे बसविल्याने हे अपघात टळणार आहेत. विशाल सेवा फाउंडेशनकडून सामाजिक उपक्रमांवर भर देण्यात आला आहे. भविष्यात अधिकाधिक सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न आहेत. फाउंडेशन नेहमीच जनतेसोबत राहणार आहे."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com