संक्षिप्त

संक्षिप्त

पान ५ साठी, संक्षिप्त)


घाणेखुंटमध्ये २०० ग्रामस्थांची तपासणी
चिपळूण ः सध्याच्या दगदगीच्या जीवनात बदलत्या जीवनशैलीमुळे होणारे शारीरिक ताणतणाव, आजारपण, एमआयडीसीमुळे होणारे प्रदूषण, कोविडच्या प्रादुर्भावानंतर उद्‍भवलेले विविध साईडइफेक्ट व दैनंदिन शरीराच्या तक्रारी याचा विचार करून गोदरेज अॅग्रोवेट लिमिटेड आणि परिवर्तन संस्था व ग्रामपंचायत घाणेखुंटच्यावतीने तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर झाले. यात २०० रुग्णांची मोफत तपासणी व औषधे दिली. हिमोग्लोबिन, शुगर, ब्लडप्रेशर तपासण्यात आला. प्रत्येक व्यक्तीला पौष्टिक खाद्य व फळेही दिली. शिबिरामुळे ग्रामपंचायतीच्या आरोग्यदायी व सुदृढ गाव या मोहिमेला हातभार लागला, असे सरपंच राजू ठसाळे यांनी सांगितले. परिवर्तन संस्थेचे समनव्यक खेतले यांनी योग्य आहार व व्यायामाबाबत माहिती दिली. या वेळी मधुकर गवळी, उपसरपंच नजीर सुर्वे, सदस्य रविना खांबल, शीतल पाष्टे, विकास पवार, ग्रामविकास अधिकारी सोनकुसरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


कापरे आरोग्य केंद्रातर्फे शिबिर
चिपळूण ः शासकीय रुग्णालय आणि आरोग्यसंस्थांमध्ये सर्वांना समान सुविधा उपलब्ध करून जास्तीत जास्त रुग्णांनी सार्वजनिक रुग्णांलयांच्या सुविधांचा वापर करावा, या विषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कापरेअंतर्गत उपकेंद्र भिलेअंतर्गत धामेली येथे जागतिक आरोग्य दिनानिमित्त आरोग्य शिबिर घेण्यात आले. या वेळी आरोग्य केंद्र कापरे येथे ‘सुंदर माझा दवाखाना’ या संकल्पनेतून केंद्रांची अंतर्गत व बाह्य परिसराची स्वच्छता करण्यात आली. हे शिबिर सरपंच अनिल भोजने यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी पंचायत समितीचे माजी सदस्य रगुनाथ ठसाले, बाळा तटकरे उपस्थित होते. जनतेमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी कापरे प्राथमिक आरोग्य केंद्रातून वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशासेविका देखील सहभागी झाले होते. ‘समान आरोग्यसेवा’ हे यंदाच्या जागतिक आरोग्यदिनाचे घोषवाक्य आहे. या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. राणी नागटिळक, आरोग्य सहाय्यक डॉ. परशुराम निवेंकर, मिलिंद जंगम, सीमा कवठनकर, आरोग्यसेवक चव्हाण, गटप्रवर्तक वरवडेकर, आरोग्य कर्मचारी, आशासेविका यांनी स्वच्छ्ता व सुशोभीकरण करण्यासाठी सहकार्य केले.

९४७७२

जिल्हा समन्वयकपदी सुचित्रा खरे
चिपळूण ः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सुरू केलेल्या शिव आरोग्यसेनेच्या रत्नागिरी जिल्हा विभागीय समन्वयकपदी चिपळूणच्या माजी नगरसेविका सुचित्रा खरे यांची निवड केली. निवडीचे पत्र शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते त्यांना प्रदान केले. शिवसेनाप्रमुख पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिव आरोग्यसेना हा विभाग सुरू करण्यात आला आहे. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या शिवसेनेच्या विचारधारेप्रमाणे सर्वसामान्य जनतेला उत्तम आरोग्यसेवा मिळावी, या हेतूने हा विभाग सुरू करण्यात आला आहे. मुंबईच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ या विभागाच्या राज्याच्या अध्यक्ष असून, डॉ. किशोर ठाणेकर कार्याध्यक्ष आहेत. या दोघांच्या स्वाक्षरीने रत्नागिरी जिल्हा विभागीय समन्वयक म्हणून निवडीचे पत्र खरे यांना प्राप्त झाले. या वेळी पक्षाचे उपजिल्हाप्रमुख प्रताप शिंदे, विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, माजी उपजिल्हाप्रमुख राजू भागवत, श्रीराम खरे, महिला आघाडी शहरप्रमुख वैशाली शिंदे आदी पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com