चिखले यांची निवड

चिखले यांची निवड

फोटो ओळी
-rat१०p२१.jpg ः
९४८१६
खेड ः खेडच्या विरेंद्र चिखले यांची लायन्स क्लबच्या उपप्रांतपालपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना वैभव खेडेकर.
-
लायन्स क्लबच्या उपप्रांतपालपदी विरेंद्र चिखले

खेड ः खेड येथील विरेंद्र चिखले यांची लायन्स क्लबच्या उपप्रांतपालपदी नुकतीच निवड झाली. अक्कलकोट येथे झालेल्या विभागीय परिषदेत ही निवड झाली. विरेंद्र चिखले यांना १३१ मते मिळाली तर प्रतिस्पर्धी उमेदवाराला ११६ मते मिळाली. चिखले यांच्या माध्यमातून प्रथमच खेडला उपप्रांतपाल हे पद मिळाले आहे. गेली अनेक वर्षे लायन्सच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवा केली आहे. त्या सेवेची ही पोचपावती असल्याची प्रतिक्रिया चिखले यांनी दिली. उपप्रांतपालपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मनसेचे खेड नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी अभिनंदन केले. या वेळी खेड लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. विक्रांत पाटील, विनया चिखले, सदस्य रोहन विचारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
--
फोटो ओळी
-rat१०p२२.jpg ः
९४८१७
खेड ः हनुमान जन्मोत्सवानिमित्त काढण्यात आलेली छबिना मिरवणूक.
--
खेडमध्ये हनुमान जयंती उत्साहात

खेड ः खेडमध्ये हनुमान जन्मोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. येथील हनुमान मंदिरात सकाळी साडेसहा वाजता प्राची पेंडसे यांचे श्री हनुमान जन्मकाळावर कीर्तन झाले. त्यानंतर दुपारी ३ ते रात्री १०.३० वाजेपर्यंत खेड शहरातून छबिना मिरवणूक काढण्यात आली. ४ ते ९ एप्रिलपर्यंत साजरा करण्यात आलेल्या या उत्सवात हळदी कुंकू, विविध करमणुकीचे कार्यक्रम तसेच सामजिक व शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. या वेळी माजी नगरसेवक मिनार चिखले, रूपल पाटणे, प्रेमल चिखले, भूषण चिखले, पराग चिखले, शैलेश गांगण, नितीन पाटणे तसेच वैश्य समाजातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.
-

फोटो ओळी
- rat१०p२३.jpg ः
९४८१८
खेड ः मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत देवसडे मुख्य रस्ता व पुलाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
-
देवसडे मुख्य रस्ता व पुलाचे उद्घाटन

खेड ः तालुक्यातील देवसडे येथे हभप गुरूवर्य गोपाळ महाराज कांगणे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून माजी आमदार संजय कदम, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्या हस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत देवसडे मुख्य रस्ता व पुलाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी ज्येष्ठ शिवसैनिक व खेड नगर पालिका माजी नगराध्यक्ष नागेश तोडकरी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुकाप्रमुख संदीप कांबळे, खेड पंचायत समितीचे माजी सदस्य श्रीधर गवळी, हभप नित्यानंद गोपाळ बुवा कांगणे महाराज, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खेड शहरप्रमुख दर्शन महाजन, अनिल जाधव, भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम आदी उपस्थित होते.
-

फोटो ओळी
-rat१०p२४.jpg ः
९४८१९
लोटे ः विद्यार्थ्यांना रुग्णसेवेची शपथ देताना प्राचार्य मिलिंद काळे.
-

एमईएस नर्सिग कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे शपथग्रहण

चिपळूण ः घाणेखुंट लोटे येथील एमइएस नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना येथील शिक्षकांकडून मिळणारे वैयक्तिक मार्गदर्शन हेच या कॉलेजच्या अल्पावधीत मिळालेल्या प्रसिद्धी व यशाचे रहस्य आहे, असे गौरवोद्गार मंत्रालयातील डेप्युटी सचिव यमुना जाधव यांनी या कॉलेजच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या शपथग्रहण सोहळ्यात काढले. सुमारे १६२ वर्षांचा इतिहास असलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणेच्या एमइएस स्कूल अँड कॉलेज ऑफ नर्सिंगच्या ए. एन. एम., जी. एन. एम. आणि बी. एस्सी. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा शपथग्रहण सोहळा नुकताच झाला. सोहळ्याला यमुना जाधव, डेप्युटी सचिव मंत्रालय, कॉलेज सल्लागार समितीचे अध्यक्ष ॲड. सागर नेवसे, नियामक मंडळ सदस्य डॉ. आनंद लेले, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर, अधीक्षक डॉ. शाम भाकरे, प्राचार्य मिलिंद काळे, उपप्राचार्य शिवप्रसाद हळेमनी, डॉ. शाहिद परदेशी, कॉलेजची माजी विद्यार्थिनी पायल कांबळे तसेच पालक उपस्थित होते. प्राचार्य मिलिंद काळे यांनी विद्यार्थ्यांना ''मी रुग्णसेवा ही ईश्वरसेवा मानून सदैव हसतमुख चेहरा ठेवून रुग्णांना सेवा देऊन आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करेन व हे रुग्णसेवेचे स्वीकारलेले व्रत कधीही मोडणार नाही'', अशी शपथ दिली.
-
फोटो ओळी
-rat१०p२७.jpg ः
९४८३६
टाळसुरे ः येथील विद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उपनिरीक्षक राजेंद्रकुमार यादव.
-
टाळसुरे विद्यालयात सायबर क्राईमवर मार्गदर्शन

दाभोळ ः सह्याद्री शिक्षणसंस्था सावर्डेचे न्यू इंग्लिश स्कूल अॅड ज्युनि. कॉलेज टाळसुरे विद्यालयामध्ये सायबर क्राईमपासून कसे सावध राहावे याबाबत दापोली पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक राजेंद्र कुमार यादव यांनी मार्गदर्शन केले. सध्याच्या दिवसात सायबर क्राईममध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, युवागट याचा बळी पडत आहे म्हणून त्यांच्यात जनजागृती करण्यासाठी या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पोलिस उपनिरीक्षक यादव यांनी महिलांवर होणारे अन्याय कसे रोखावे, अल्पवयीन मुलांनी विनापरवाना वाहन चालवल्यामुळे होणारे धोके तसेच पोक्सो कायदा आदींविषयी मार्गदर्शन केले. या वेळी दापोली पोलिस ठाण्यातील सुहास पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक संदेश राऊत उपस्थित होते. टाळसुरे विद्यालयातील सुमारे २५० आजी- माजी विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाला नझिर मुसा, पांडुरंग शिंदे, समीर भोसले, रोशनी बुरटे, ओंकार जोशी, अविनाश शिंत्रे, दीपनंदा बोधे, शारदा धनगुडे आदी उपस्थित होते.
-

केळशीत महालक्ष्मीचा रथोत्सव उत्साहात

दाभोळ ः केळशी येथील श्री महालक्ष्मीच्या रथ उत्सवाची मिरवणूक पंरपरेनुसार दरवर्षीप्रमाणे काढण्यात आली. या रथोत्सवाला भक्तगणांचा उदंड प्रतिसाद मिळाला. दापोली तालुक्यातील केळशी येथे श्री महालक्ष्मी देवीचे सुप्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरातील हनुमान जयंतीला श्री महालक्ष्मीचा सर्वात मोठा उत्सव होतो. या उत्सवासाठी केळशी आणि परिसरात राहणाऱ्या आणि नोकरीधंद्यानिमित्त गावापासून दूर राहणारे भक्त-भाविक या उत्सवाला आवर्जून हजेरी लावतात. लोकांची या देवीवर अपार श्रद्धा आहे. या देवीचा उत्सव म्हणजे शिस्तबद्ध, जातीनिरपेक्ष आदर्श समाजरचनेचा एक उत्कृष्ट नमुना मानला जातो. या उत्सवात सर्व जाती-जमातीच्या लोकांचा सहभाग असतो.
-

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com