जिल्हास्तरीय औषधी वनस्पती पीपीटी

जिल्हास्तरीय औषधी वनस्पती पीपीटी

जिल्हास्तरीय औषधी वनस्पती
पीपीटी नोंदवही स्पर्धेचा निकाल जाहीर

रत्नागिरी, ता. १० ः जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ व जेएसडब्ल्यू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय औषधी वनस्पती पीपीटी व नोंदवही स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. हे स्पर्धेचे तिसरे वर्ष होते.
नोंदवही स्पर्धेत पाचवी ते आठवी गटात कोतवडेतील विजयसिंहराजे पटवर्धन इंग्लिश स्कूलच्या प्रचिती पातये, नववी व दहावी गटात विश्वनाथ विद्यालय लवेल येथील अमेय लोहार, अकरावी-बारावी गटात अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या ऋचा पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला. पीपीटी स्पर्धेत सहावी ते आठवी गटात गुरूवर्य रामचंद्र जोग संजीवनी गुरूकूलच्या मृणांक पाडाळकर, श्रीदेव गोपाळकृष्ण विद्यामंदिरच्या (गुहागर) केतकी निमकर, अकरावी-बारावी गटात लांजा न्यू इंग्लिश स्कूलच्या आर्यन काळोखे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. नोंदवही स्पर्धेचे परीक्षण विजयानंद निवेंडकर, आनंद खांडेकर, संजय घाडी, संघमित्र कुरतडकर यांनी तर पीपीटीचे परीक्षण संपदा धोपटकर यांनी केले. विद्यार्थ्यांचे अभिनंदन जेएसडब्लू फाउंडेशनचे अनिल दधीच, विज्ञान शिक्षक मंडळाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इनामदार, उपाध्यक्ष राजू जानकर, कार्यवाह प्रभाकर सनगरे, यांनी केले आहे.
-
नोंदवही स्पर्धेचा निकाल (द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ या क्रमाने)
आठवी ते दहावी गट- मोहा कांबळे (पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी), संप्रह यादव (रा. भा. शिर्के प्रशाला रत्नागिरी), उत्तेजनार्थ जागृती चव्हाण (शिवाजीराव सुर्वे विद्यालय, निवळी ता. चिपळूण), सुयश चांदिवडे (विश्वनाथ विद्यालय लवेल). नववी- दहावी गट- सिद्धी जाधव व जान्हवी मायदेव (श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यालय, गुहागर), श्रुती जोशी (माध्यमिक विद्यालय, वरवडे), प्राची पळसमकर (माध्यमिक विद्यालय वडदहसोळ- राजापूर), सानिका करंजकर (न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, आंबडस), अकरावी, बारावी- सानिका आपणकर (दादासाहेब सामंत ज्युनि. कॉलेज), पूजा सोड्ये (गोडे- दाते कनिष्ठ महाविद्यालय, राजापूर), विभक्ती निवळकर (श्रीमती बापट कनिष्ठ महाविद्यालय, वाटद- खंडाळा), श्रावणी भाटकर व मानसी गुरव (डॉ. सावंत ज्युनि. कॉलेज). पीपीटी स्पर्धेचा सविस्तर निकाल- पाचवी ते आठवी- पार्थ भोसले, कैवल्य कुलकर्णी, मिहीर कोवरकर, दुर्वा चव्हाण. अकरावी बारावी- वरेश पुसाळकर, पुर्वा जाधव.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com