-रोव्हरद्वारे जमिनीची अर्ध्या तासात अचुक मोजणी

-रोव्हरद्वारे जमिनीची अर्ध्या तासात अचुक मोजणी

(पान ३ साठी, अॅंकर)

-rat१०p४०.jpg-
९४९२६
चिपळूण ः उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.
---
रोव्हरद्वारे जमिनीची अर्ध्या तासात अचुक मोजणी

ज्ञानेश्वर निकाळजे ; मोजणी अर्ज निकाली काढण्याची मोहीम यशस्वी

राष्ट्रीय भूमापन दिन--लोगो

नागेश पाटील/सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १० ः राज्यात जमीन मोजण्यासाठी रोव्हर ड्रोन अत्याधुनिक तंत्राचा वापर केला जात आहे. रोव्हरद्वारे अर्ध्या तासात अचुक मोजणी होते आणि जमिनीचे अक्षांस, रेखांश अधारित नकाशा मिळाल्यामुळे त्यांची वैधता अबाधित राहणार आहे. भूमी अभिलेख विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नानंतर सहा महिने व एक वर्षापेक्षा जास्त कालावधीचे मोजणी अर्ज निकाली काढण्याची मोहीम यशस्वी होत आहे, असे प्रतिपादन अभिलेख चिपळूणचे उपअधीक्षक ज्ञानेश्वर निकाळजे यांनी केले.
भारतातील जमीनी मोजणी १० एप्रिलला सुरू झाली. त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय भूमापन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जिल्ह्यात १० एप्रिल हा राष्ट्रीय भूमापन दिन भूमी अभिलेख चिपळूण येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते झाले. या वेळी तहसीलदार तानाजी शेजाळ, भूमी उपअधीक्षक ज्ञानेश्वर निकाळजे, मुख्यालय सहाय्यक मीना बोटे, शिरस्तेदार व कर्मचारी संजय पाटोळे, निमाताकदार नगर भूमापन दीपक गजापकर, छाननी लिपिक अशोक वसावे, भूकरमापक अमर जाधव, शंकर धायगुडे, प्रकाश पगारे, निमत्ताकदार कीर्ती तारी, श्रीमती मिनल वालम आदी उपस्थित होते. प्रास्ताविक नगर भूमापन दीपक गजापकर यांनी केले. श्री. गजापकर यांनी भूमापन दिनाबाबत माहिती दिली. उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.
--

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com