कोळंब-लाडवाडीत १० मेपासून कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोळंब-लाडवाडीत
१० मेपासून कार्यक्रम
कोळंब-लाडवाडीत १० मेपासून कार्यक्रम

कोळंब-लाडवाडीत १० मेपासून कार्यक्रम

sakal_logo
By

कोळंब-लाडवाडीत
१० मेपासून कार्यक्रम
आचरा, ता. १४ ः कोळंब-लाडवाडी येथील महादेवी आकार सेवा मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त १० व ११ मेस तेथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
१० मेस सकाळी ९ ते १ रक्तदान व आरोग्य शिबिर, सायंकाळी ७ वाजता अष्टपैलू कलानिकेतन, मालवण यांचा ‘भक्तीसंध्या’ कार्यक्रम, रात्री साडेनऊला एकेरी रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार आहेत. स्पर्धकांनी ७ मेपर्यंत शितल लाड, विनय लाड यांच्याशी संपर्क साधावा. ११ ला सकाळी नऊला दुग्धाभिषेक, सत्यनारायण महापूजा व महाआरती, दुपारी एक ते तीन महाप्रसाद, तीनला देवीची ओटी भरणे व हळदीकुंकू, सायंकाळी सातला भजनसम्राट भालचंद्र केळुसकर यांचे भजन, रात्री नऊला सांस्कृतिक कार्यक्रम, दहाला कलांकुर ग्रुप, मालवण निर्मित मराठमोळा नजराणा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.