जलजीवन मिशनअंतर्गत प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जलजीवन मिशनअंतर्गत प्रशिक्षण
जलजीवन मिशनअंतर्गत प्रशिक्षण

जलजीवन मिशनअंतर्गत प्रशिक्षण

sakal_logo
By

२० (टुडे २ साठी)

- rat२०p१७.jpg-
९७२४०
चिपळूण ः जलजीवन मिशनअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
----
पाण्याच्या गुणवत्तेवर भर द्या ; घार्गे-पाटील

चिपळूण, ता. २० ः जलजीवन मिशनअंतर्गत पाण्याकडे केवळ अर्थव्यवस्थेतील एक घटक म्हणून न पाहता पाण्याची उपलब्धता, गुणवत्तेवर भर द्यावा, असे प्रतिपादन चिपळूणच्या गटविकास अधिकारी उमा घार्गे- पाटील यांनी केले.
जलजीवन मिशनअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील विविध भागधारकांचे प्रशिक्षण चिपळूण पंचायत समिती येथे झाले. ग्रामपंचायत स्तरांवरील विविध भागधारकांचा योजनेच्या नियोजन, योजनांची अंमलबजावणी व देखभाल-दुरुस्तीसाठी सहभाग वाढवणे यासाठी सरपंच, आशासेविका, अंगणवाडी सेविका, जलसुरक्षक व ग्रामीण पाणीपुरवठा स्वच्छता समिती सदस्य यांना प्रशिक्षणासाठी बोलावण्यात आले होते. दोन दिवसीय अनिवासी प्रशिक्षणात योजनांची दुरुस्ती व हस्तांतरण प्रक्रिया, पाईपचे प्रकार व फिटिंग, पाण्याची सुरक्षितता व शाश्वतता, ग्रामीण पाणीपुरवठा समितीच्या जबाबदाऱ्या व कर्तव्य, पाणी गुणवत्ता व त्यांचे महत्व, विविध तपासणी व त्यांचे प्रात्यक्षिक, पंपाचे प्रकार व प्रतिबंधात्मक उपाययोजना आदी विषयांवर तज्ञ मार्गदर्शकांनी माहिती दिली. या प्रशिक्षणाची सुरवात पंचायत समिती चिपळूणच्या गटविकास अधिकारी घार्गे-पाटील यांनी प्रशिक्षणार्थींना जलप्रतिज्ञेनेची शपथ देऊन केली. सहभागी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देऊन सांगता करण्यात आली. या वेळी उपअभियंता, सहाय्यक गटविकास अधिकारी, सर्व विस्तार अधिकारी उपस्थित होते.
--