सावंतवाडीत पार्किंग निश्चितीसह सेल्फी पॉईंटचे काम पूर्ण करा

सावंतवाडीत पार्किंग निश्चितीसह सेल्फी पॉईंटचे काम पूर्ण करा

97739
सावंतवाडी : मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना निवेदन देताना मोहिनी मडगावकर, बंटी पुरोहित.

सावंतवाडीत पार्किंग निश्चितीसह
सेल्फी पॉईंटचे काम पूर्ण करा

भाजपची मागणी; प्रशासनास निवेदन

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २२ ः शहरातील मोती तलावाच्या स्लॅबवर अपूर्णावस्थेत असलेल्या सेल्फी पॉईंटचे काम तातडीने पूर्ण करा. तसेच बाजारपेठेमध्ये पार्किंगची जागा निश्चित करा, अशी मागणी भाजपच्या महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बंटी पुरोहित यांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
शहरामध्ये भाजपच्या सत्ताकाळात येथील श्रीराम वाचन मंदिरसमोरील स्लॅबवर सेल्फी पॉईंटचे काम हाती घेतले होते; मात्र हे काम गेले वर्षभर अर्धवट स्थितीत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता प्रत्येक तालुक्यामध्ये सेल्फी पॉईंट आज चर्चेचा विषय ठरला आहे; परंतु सावंतवाडीसारख्या शहरामध्ये सेल्फी पॉईंटचे काम रखडल्याचे दिसून येते. हे काम त्वरित सुरू करून शहरवासीयांसाठी सेल्फी पॉईंट उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सौ. मडगावकर व श्री. पुरोहित यांनी केली आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेच्या रस्त्यावरील दोन्ही बाजूने भाजी विक्रेत्या महिला बसत असल्याने वाहन चालकांना पार्किंगची समस्या निर्माण होते. प्रसंगी आठवडा बाजार व अन्य दिवशी वाहतूक पोलिसांच्या कारवाईला चालकांना सामोरे जावे लागते. त्यामुळे शहरात कायमस्वरूपी पार्किंगची जागा निश्चित करावी. जेणेकरून वाहन चालकांना आपल्या गाड्या त्या ठिकाणी उभ्या करता येऊ शकतील, असेही दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com