दांडीतील धोकादायक वाहिनी स्थलांतरित

दांडीतील धोकादायक वाहिनी स्थलांतरित

दांडीतील धोकादायक वाहिनी स्थलांतरित
मालवण ः दांडी येथील तृषाली तारी यांच्या घरावरून गेलेली ११ केव्हीची महावितरणची विद्युतभारीत वाहिनी अखेर काल (ता. २१) स्थलांतरित करण्यात आली. शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधींच्या पुढाकारामुळे हे काम मार्गी लागल्याने तारी कुटुंबीयांनी आभार मानले. दांडी येथील तृषाली तारी यांच्या घरावरून महावितरणचीं ११ केव्हीची वीज वाहिनी गेली होती. त्यामुळे तारी कुटुंबीयांना धोका होता. यासाठी त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले असता, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी नगरसेविका सेजल परब, तृप्ती मयेकर, पंकज सादये, सन्मेष परब, तपस्वी मयेकर यांनी आमदार वैभव नाईक यांचे लक्ष वेधले. त्यानुसार आमदार नाईक यांनी महावितरणच्या कणकवली कार्यकारी अभियत्यांना पत्र पाठवून याबाबतची कार्यवाहीची सूचना दिली.
.................
मिलाग्रीस स्कूलचे ‘बीडीएस’मध्ये यश
सावंतवाडी ः ‘ऑल इंडिया ब्रेन डेव्हलपमेंट’ (बीडीएस) परीक्षेत मिलाग्रीस इंग्लिश प्रायमरी स्कूलचा विद्यार्थी मयुरेश मोर्ये याने ९३ गुणांसह अठरावा क्रमांक मिळवून सुवर्णपदक मिळविले. तसेच विद्यार्थिनी शुभ्रा रवींद्र गवस हिने ८७ गुणांसह ९४ वा क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकाविले.
--------------------
उसपवासीयांना ‘आनंदाचा शिधा’
दोडामार्ग ः राज्य सरकारतर्फे दिला जाणारा ‘आनंदाचा शिधा’ जिन्नस वाटपाला उसपच्या सरपंच रुचिता गवस यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. यावेळी उसप खोक्रल विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन तथा जिल्हा बँक माजी संचालक प्रकाश गवस, माजी सरपंच धनंजय गवस, उपसरपंच दाजी नाईक, ग्रामपंचायत सदस्या विनिता मोरजकर, करुणा गवस तसेच विलास मोरजकर, कृष्णा गवस आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com