खोपी -पिंपळवाडी धरणासाठी साडेचार कोटींचा खर्च

खोपी -पिंपळवाडी धरणासाठी साडेचार कोटींचा खर्च

२ ( पान ६ साठी)

फोटो ओळी
-rat२२p२.jpg-
९७७१८
खेड ः धरणाच्या पायथ्याजवळील विद्युतगृहाच्या पुढील बाजूस लगतच असलेले सुपर पॅसेजच्या पुढे मुख्य कालवा येथील एस्केपचे बांधकाम कोसळले दिसून येत आहे.
--
खोपी-पिंपळवाडी धरणासाठी साडेचार कोटींचा खर्च

कालवे सुस्थितीत आणणार ; मुबलक पाणी शक्य

खेड, ता. २२ ः पिंपळवाडी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या मुख्य कालव्याची दुर्दशा झाली असून, डिसेंबर २०२१ ला एस्केप ढासळला आहे. पिंपळवाडी प्रकल्पावर जलविद्युत केंद्र असून, पावसाळी हंगामात धरणातून विसर्ग सदर एस्केपद्वारे नदीपात्रात सोडण्यात येते. याबाबत ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीमुळे रत्नागिरी पाटबंधारे मंडळाच्या अधीक्षक अभियंता यांनी नादुरुस्त बांधकामाची २८ जानेवारी २०२२ ला पाहणी केली होती.
पावसाळ्यामध्ये धरणाचे पायथा विद्युतगृहाचे पुढील लगतचे सुपर पॅसेजच्या पुढे मुख्य कालवा येथील एस्केपचे बांधकाम पूर्णतः कोसळले आहे. त्यामुळे धरण पायथा विद्युतगृहामधून वीजनिर्मितीनंतरचा अवजल विसर्ग हा कालव्यामार्गे एस्केपचे बांधकाम कोसळल्याने पाणी नदीत पोहोचेपर्यंत आजूबाजूच्या शेतात पसरत असल्याने शेतीचे नुकसान होत आहे. उजव्या मुख्य कालव्याला जाणाऱ्या पाइपलाइनच्या विहिरीमधून गळतीमुळे पाणी वाया जात आहे. एस्केप व विहिरीमधून वाहून जाणारे गळतीचे पाणी नदीकडे जाताना शेतकऱ्यांच्या खासगी जमिनीतून जात असून, यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचे नुकसान होत आहे. सद्यःस्थितीमध्ये गळतीचे पाणी जाण्याकरिता खासगी जमिनीतून चर काढला आहे; मात्र या ठिकाणी भराव असल्यामुळे एस्केप व विमोचक विहिरीचे नव्याने बांधकाम करणे शक्य नसल्यामुळे पिंपळवाडी धरणाच्या पायथा जलविद्युत गृह ते एस्केप व उजवा कालवापर्यंतचा मुख्य कालवा बंदिस्त पाइपलाइनमध्ये करण्याबाबत स्वतंत्र अंदाजपत्रक सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार बंदिस्त पाइपलाइन करण्याच्या कामाची गरज लक्षात घेऊन कामाचे सर्वेक्षण व संकल्पन खासगी सल्लागाराकडून करून घेण्यात आले आहे.
या कामांच्या दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करून वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यात आले होते. सद्यःस्थितीत धरणाचे काम पूर्ण झालेले असून लोकांची पाणीपुरवठा करण्यासाठी मागणी येत आहे; मात्र एस्केप व उजव्या कालव्याच्या विहिरीमधून गळती होत असल्याने पाणी पूर्ण क्षमतेने पुढे जात नाही. बंदिस्त पाइपलाइनच्या विविध घटकांच्या अंदाजपत्रकाचा खर्च ३ कोटी ६२ लाख ६४ हजार ८९० असून या खर्चाच्या रक्कमेवरील जीएसटी, स्वामित्व शुल्क व विमा शुल्क मिळून ४ कोटी ३४ लाख २५ हजार ८०७ एवढा निधीच्या प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. याबाबत लवकरात लवकर निधी मंजूर झाल्यास एस्केप व विमोचक विहिरीची दुरुस्ती केल्यास ग्रामस्थांना मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com