रुग्णाने डॉक्टरांसमोर तंबाखू सोडल्याची घेतली शपथ

रुग्णाने डॉक्टरांसमोर तंबाखू सोडल्याची घेतली शपथ

७ (पान ६ साठी)

रुग्णाने तंबाखू सोडल्याची घेतली शपथ

मातृमंदिरमध्ये शिबिर ; मोफत आरोग्य शिबिराला प्रतिसाद

साडवली, ता. २२ ः कॅन्सर पेशंट एड सोसायटी यांच्यातर्फे मातृमंदिर देवरूख येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर झाले. या वेळी तपासणीदरम्यान तंबाखू खाणाऱ्‍या पेशंटच्या तपासणीदरम्यान पुढील धोका डॉक्टरांनी त्या रुग्णाला सांगितला व कुटुंबाची जबाबदारी तुमच्यावर आहे, तुम्ही तंबाखू खाणे बंद करा, असे सांगताच त्या रुग्णाने खिशातील पुडी टेबलवर ठेवली. ‘मी यापुढे तंबाखू खाणार नाही, अशी शपथ घेतली.’ या वेळी सर्व स्टाफने त्यांचे कौतुक केले.
शिबिरात कॅन्सरपूर्व तपासणीसह रक्त तपासणी, नाक, कान, घसा तपासणी, महिला व पुरुषांची आरोग्य तपासणी अशा सर्व प्रकारची रुग्ण तपासणी या शिबिरात करण्यात आली. कॅन्सर पेशंट एड असोसिएशनच्या एक्सिक्युटिव्ह डायरेक्टर नीता मोरे यांच्या नेतृत्वाखाली प्रसिद्ध सर्जन डॉ. रवींद्र अंबार्डेकर, गायनॉकॉलिस्ट डॉ. तृप्ती पोयरेकर, फिजिशियन वीणा बोरकर या तज्ञ डॉक्टर टीमने रुग्ण तपासणी केली. सोबत असलेल्या लॅब टेक्निशियन व इतर सर्व सहकाऱ्यांनी शिबिरादरम्यान केलेल्या कामातून त्यांची सेवाभावी वृत्ती दिसून आली.
आत्तापर्यंत अगदी देशाच्या बॉर्डरपर्यंत जाऊन रुग्णसेवा दिलेल्या कॅन्सर पेशंट एड असोसिएशन देशभरात जवळपास ३ लाख जणांपर्यंत पोहोचले आहेत. मातृमंदिरमधील तपासणीबाबत बोलताना डॉ. अंबार्डेकर व नीता मोरे यांनी रुग्ण तपासणी अहवाल मांडला. या तपासणीमध्ये घशाचा कॅन्सर, पुरुषांमधील प्रोस्टेट ग्रंथी व महिलांमधील स्तन परीक्षेद्वारे केलेल्या तपासणीत रुग्णांना पुढील तपासणीसाठीचा सल्ला व समुपदेशन करण्यात आले.
देवरूख पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भरत चौगुले यांनी भेट देऊन कुटुंबासाह तपासणी करून घेतली. देवरूखमधील रुग्ण व मातृमंदिर परिवार यांनी याचा मोठ्या प्रमाणावर फायदा घेतला. या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष विलास कोळपे, कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये, सेक्रेटरी विनय पानवलकर, सुहास बने, कार्योपाध्यक्ष सुनील कोलवणकर, संचालक संतोष शेट्ये व संदेश शेट्ये यांनी स्वतः तपासणी करून घेत उपस्थिती लावली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com