चिपळूण तालुक्यातील 51 वर्षापूर्वीच  आंबतखोल धरण

चिपळूण तालुक्यातील 51 वर्षापूर्वीच आंबतखोल धरण

११ (पान २ साठी मेन)

-rat२२p१९.jpg-
९७७६७
सावर्डे ः लघुपाटबंधारे विभागाने बांधलेले आंबतखोल येथील मातीचे धरण.
-
धरण उशाला असूनही शेतजमिनी ओसाड

मातीचे आंबतखोल धरण तुडुंब ; शेतीकडे पाठ
सकाळ वृत्तसेव
सावर्डे, ता. २२ ः चिपळूण तालुक्यातील सावर्डे परिसरातील पहिले मातीचे धरण आंबतखोल गावी साकारण्यात आले. तब्बल ५१ वर्षापूर्वीचे धरण असून माती धरणामुळे सुरवातीच्या काळात उन्हाळी शेती मोठ्या प्रमाणात झाली. मात्र पुरेशा बाजारपेठेचा अभाव, तरुणपिढीचा नोकरीकडे कल, रानटी जनावरांचा वावर यामुळे लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेले धरण तुडुंब भरूनदेखील येथील जमिनी ओस पडून आहेत.
या धरणाची दुरुस्ती दोनवेळा करण्यात आली असून, प्रचंड पाणीसाठा असणाऱ्या पाण्याचा वापर अपेक्षित शेतीसाठी होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. आंबतखोल धरणावरील पाण्यावर आंबतखोल, कुडप, पाणीयोजना सुरू असून नव्याने सावर्डे जलजीवन योजनेचे जॅकवेलचे काम या धरणाजवळ सुरू करण्यात आले आहे. हे धरण १९७३ ला मंजूर झाले. आंबतखोल धरण केवळ पाच वर्षात १९७८ ला काम पूर्ण करण्यात आले. २३.१७ लाख रु. खर्च आला. या धरणामुळे ११० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. आंबतखोल व हडकणी गावच्या सीमेलगत डोंगरखोऱ्यात हे धरण वसले असून, सुरवातीला काळात १९९० पर्यंत आंबतखोल, येगाव, कुशिवडे गावात उन्हाळी शेती मोठ्या प्रमाणात केली जात होती; मात्र १९९० नंतर या परिसरातील तरुणवर्ग शेतीऐवजी नोकरी, मंडप व्यवसायाकडे झुकला. त्यामुळे शेती ओस पडली. मुबलक पाणी असताना येथील ११० हेक्टर उन्हाळी शेती ओसाड आणि पडिक झाली आहे.
या धरणाचे पाणी गडनदीला मिळते. गडनदीचे पात्रातील पाणी कमी झाले की, या धरणाचे पाणी सोडले जात होते. एप्रिल ते जून या काळात खेरशत, कोकरे, नायशी येथील नदीला पाणी मुबलक उपलब्ध होत होते. या धरणाच्या देखरेखीसाठी पाटबंधारे विभागाकडून कर्मचारी असे; मात्र गेली अनेक वर्षे तृतीय वर्ग कर्मचारी भरती नसल्याने तुरळक शेती करणाऱ्या लोकांना पाणी पाहिजे असल्यास संबंधित खात्याकडे संपर्क करावा लागत असल्याने गैरसोयीचे होत आहे.
----

चिपळूण तालुक्यातील धरणे व पाणीसाठा क्षमता
धरण*पाणीसाठा (द. ल. घ मीटर)

आंबतखोल*२ हजार ४०५
असुर्डे*१.८५
फणसवाडी*१.४०८
मालघर*२.०१
कळवंडे*१.९७
अडरे*३. ४२४
खोपड*१.८६३
मोरवणे*३.८४१
राजेवाडी*३.१००

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com