रत्नागिरीत कन्झ्युमर्स शॉपीचा आजचा शेवटचा दिवस

रत्नागिरीत कन्झ्युमर्स शॉपीचा आजचा शेवटचा दिवस

१८ (पान २ साठी)

-rat२२p१७.jpg-
९७७६४
रत्नागिरी ः पटवर्धन हायस्कूल ग्राऊंड येथे सुरू असलेल्या कंझ्युमर्स शॉपी प्रदर्शनाला झालेली गर्दी.
---
रत्नागिरीत कन्झ्युमर्स शॉपीचा आजचा शेवटचा दिवस

रत्नागिरी, ता. २२ ः ३० वर्षांची यशस्वी परंपरा लाभलेल्या कंझ्युमर्स शॉपी प्रदर्शनाला दिवसेंदिवस रत्नागिरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. गृहोपयोगी वस्तू, कपडे, स्वयंपाकगृहातील भांडी, व्यायामाचे साहित्य यांपासून विविध खाद्यपदार्थ खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. दरम्यान, रविवारी (ता. २३) या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असून उद्या हे प्रदर्शन सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.
या प्रदर्शनाला १९ एप्रिलपासून सुरवात झाली. प्रदर्शनामध्ये नावीन्यपूर्ण वस्तू पाहायला मिळत आहेत. ज्या गोष्टी रत्नागिरीमध्ये उपलब्ध होत नाहीत किंवा फक्त ऑनलाइन उपलब्ध आहेत, अशा वस्तू हाताळायला सुद्धा मिळत असल्याने या प्रदर्शनाला रत्नागिरीकरांची चांगली गर्दी पाहायला मिळत आहे.

लेडीज गारमेंट, लखनवी फुलकारी, फूड प्रॉडक्टस्, हेल्थकेअर प्रॉडक्ट, हस्तकलेतून साकारलेल्या वस्तू, ज्वेलरी, साडी, लेदर पर्सेस, चहा अशी विविध उत्पादने या प्रदर्शनात आहेत तसेच सौंदर्यप्रसाधने, अगरबत्ती, कारपेटस, फर्निचर, वॉटर प्युरिफायर, नॉनस्टिक कुकवेअर, ओव्हन्स, फूड प्रोसेसर, स्टेनलेसस्टिलच्या विविध स्वयंपाकगृहात लागणाऱ्या वस्तूसुद्धा उपलब्ध आहेत. लहान मुलांचे कपडे, लाकडी खेळणीसुद्धा उपलब्ध आहेत. शेतीसाठी लागणारी विविध अवजारे व भाजीपाल्याचे बियाणेसुद्धा आहेत. विविध कंपन्यांचे प्रतिनिधी आपल्या उत्पादनांची विक्री करताना प्रात्यक्षिके दाखवून ग्राहकांच्या शंकांचे निरसन करत आहेत. रत्नागिरीकरांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजिका मिनल मोहाडीकर यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com