मुस्लिम बांधवांतर्फे
घारे, नेवगींचा सत्कार

मुस्लिम बांधवांतर्फे घारे, नेवगींचा सत्कार

97785
सावंतवाडी ः अर्चना घारे व राकेश नेवगी यांचा सत्कार करताना जुम्मा मशीद पदाधिकारी व मुस्लिम बांधव.

मुस्लिम बांधवांतर्फे
घारे, नेवगींचा सत्कार
सावंतवाडी ः वैश्यवाडा येथील जुम्मा मस्जिद शेजारील गडग्याचे काम सावंतवाडी राष्ट्रवादीचे शहर चिटणीस राकेश नेवगी यांच्या सहकार्यातून पूर्ण करण्यात आले. या कामाची पाहणी कोकण विभाग महिला राष्ट्रवादी अध्यक्ष सौ. अर्चना घारे-परब यांनी केली असता जुम्मा मस्जिद ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व मुस्लिम समाज बांधवांनी राष्ट्रवादी परिवाराचे व श्री. नेवगी यांचे आभार मानले व सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, महिला शहराध्यक्ष सायली दुभाषी, जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व्यापार हिदायतुल्ला खान, रत्नागिरी जिल्हा महिला निरीक्षक दर्शना बाबर-देसाई, उद्योग व्यापार तालुका उपाध्यक्ष याकुब शेख, जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्यांक इफ्तेकार राजगुरू, तालुका चिटणीस काशिनाथ दुभाषी, जुम्मा मस्जिद ट्रस्टचे परवेज बेग, समीर बेग, कैस बेग, मोहसीन मुल्ला, शाहिद शेख, जिकर मेमन, निसार नदाफ, अबू भडगावकर व मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com