शवपेटी हलविण्याबाबतच्या पत्रामुळे संताप

शवपेटी हलविण्याबाबतच्या पत्रामुळे संताप

97826
आचरा ः आरोग्य उपकेंद्रातील शवपेटी हलविण्यास सांगितल्याचा विषयावरून वाद निर्माण झाला.


शवपेटी स्थलांतर पत्रामुळे संताप

आचरा आरोग्य केंद्रात धडक; पोलिसांच्या शिष्टाईनंतर वादावर पडदा

सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. २२ : त्रिंबकवासीयांची गरज ओळखून ग्रामविकास समितीने निधी गोळा करत शवपेटी खरेदी करून ती ग्रामपंचायतीकडे सुपूर्द केली होती. ही शवपेटी त्रिंबक उपकेंद्र येथे तात्पुरती ठेवली होती; मात्र आचरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शामराव जाधव आणि डॉ. कपिल मेस्त्री यांनी ग्रामपंचायतीला पत्र पाठवत ही शवपेटी अन्य ठिकाणी हलविण्याच्या सूचना दिल्या असून त्याची प्रत आचरा पोलिसांना सादर केल्याने संतप्त ग्रामस्थांनी आचरा आरोग्य केंद्रात धडक दिली. यावेळी आचरा पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांनी ग्रामस्थांना शांत करत प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी कांबळे यांच्याशी सपंर्क साधला. शवपेटी ठेवण्यावर तोडगा काढल्याने अखेर वादावर पडदा पडला.
त्रिंबक उपआरोग्य केंद्रात पेटी ठेवण्यास आचरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हरकत घेतल्यानंतर त्रिंबकचे सरपंच किशोर त्रिंबककर, उपसरपंच आशिष बागवे, सुरेंद्र सकपाळ, डॉ. सिद्धेश सकपाळ, संतोष घाडीगावकर, विलास त्रिंबककर, विजय सावंत, चंद्रशेखर सुतार, विनायक त्रिंबककर, बाणे आदींनी आचरा आरोग्य केंद्रात धडक दिली. प्रशासनाच्या पत्राबाबत आरोग्य केंद्रात उपस्थित असलेले डॉ. शामराव जाधव, डॉ. कपिल मेस्त्री यांना जाब विचारत संताप व्यक्त केला. या बैठकीला ग्रामस्थांनी आचरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांना बोलावले. आचरा आरोग्यकेंद्रास पूर्वकल्पना देऊन पेटी ठेवण्याची व्यवस्था होईपर्यंत शवपेटी त्रिंबक उपकेंद्र येथे ठेवली होती; मात्र त्यानंतर आचरा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी २१ रोजी पत्र काढत उपकेंद्र येथे ठेवलेली शवपेटी ही उपकेंद्र येथे न ठेवता ही शवपेटी ग्रामपंचायत स्तरावर अन्य ठिकाणी व्यवस्था करावी तसेच पेटी उपकेंद्र ठिकाणी ठेवता येत नाही, तसेच ज्या आरोग्य केंद्र ठिकाणी शवविच्छेदन इमारत नाही अशा ठिकाणीही ठेवता येत नाही तरी त्याबाबत आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग याच्याकडून मार्गदर्शन घेण्यात आले आहे. तरी ही शवपेटी अन्य ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करावी, असे त्रिंबक सरपंचांना पत्राद्वारे कळवले होते.
गावात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यावर शवपेटीची गरज भासते. त्यावेळी आरोग्य केंद्र कोणत्याही सुविधा पुरवत नाही. अशा प्रसंगी ग्रामस्थांना कणकवली, मालवण गाठावे लागते. ही गरज ओळखून ग्रामविकास समिती त्रिंबक यांनी निधी गोळा करत त्रिंबक गावासाठी सुमारे एक लाख रुपये खर्च करून शवपेटी खरेदी केली. तिच्या देखभालीसाठी खासगी माणूस नेमला. वापरानंतर निर्जंतुकीकरण करून ग्रामपंचायतजवळ पेटी ठेवण्यासाठीच्या इमारतीचे बांधकाम होईपर्यंत शवपेटी सुरक्षित रहावी म्हणून उपकेंद्र येथे आरोग्य विभागास विनंती करून ठेवली होती. आचरा आरोग्य विभाग याला हरकत घेत आहेत. आपणही सुविधा द्यायच्या नाहीत आणि दुसरे देत असतील त्यालाही विरोध करायचा असे आडमुठे धोरण आचरा विभाग अवलंबत असल्याने अशा वृत्तीमुळे मदतीस पुढे येणारे युवक, सामाजिक संस्था या मदत करणार नाहीत ते मागेच जातील असे ग्रामस्थांनी सांगत यावेळी आचरा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्या कृतीवर संताप व्यक्त केला. शवपेटी ठेवण्यास हरकत घेतल्याने आचरा आरोग्य केंद्रात त्रिंबक ग्रामस्थ दाखल झाल्याचे समजताच आचरा पोलिस निरीक्षक शंकर कोरे दाखल झाले होते. त्यांनी ग्रामस्थांना शांत करत ग्रामस्थांचे व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले.
---------
पर्यायावर ग्रामस्थांची सहमती
या विषयावर वाद न घालत बसता आपण यावर तोडगा काढू असे सांगत स्वतः जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना फोनद्वारे संपर्क करत निर्माण झालेली परिस्थिती सांगितली. यावेळी जिल्हा आरोग्य विभाग अधिकारी कांबळे यांनी ३१ मे पर्यंत पेटी ठेवण्यास परवानगी देत असल्याचे सांगितले. त्यानंतर ही पेटी दुसऱ्या पर्यायी जागेत ग्रामपंचायत घेऊन जाईल, असे लेखी पत्र आरोग्य विभागास द्यावे लागेल, असे सांगितले. या निघालेल्या पर्यायावर ग्रामस्थांनी सहमती दर्शवत ३१ मे पर्यंत पेटी आम्ही ग्रामपंचायतच्या जागेत हलवणार असल्याचे मान्य केले. आचरा पोलिस निरीक्षक कोरे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर त्रिंबकवासीय व आरोग्य विभागामध्ये पेटीवरून झालेल्या वादावर अखेर पडदा पडला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com