10 वर्षे रखडलेल्या सोनवी पुलाचे काम उद्यापासून

10 वर्षे रखडलेल्या सोनवी पुलाचे काम उद्यापासून

२६ ( पान ५ मेन )

-rat२२p२२.jpg -
९७७९७
संगमेश्वर ः सोमवारपासून सोनवी पुलाचे काम सुरू होत असून त्याची तयारी सुरू आहे.
--------

रखडलेल्या सोनवी पुलाचे काम उद्यापासून

अपघातप्रवण क्षेत्र ; १९३७ ला उभारलेला पूल अजून वापरात
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २२ ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वरजवळच्या सोनवी पुलाचे काम सोमवारपासून (ता. २४) सुरू होणार असून सुरवातीला संगमेश्वर बाजारपेठेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पिलर्सचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू होऊन जवळपास १० वर्षे झाली. इतक्या दीर्घ काळानंतर काम सुरू झाल्याने लोकानी निःश्वास सोडला आहे.
सन २०२३ला या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण करून वेगाने वाहतूक सुरू करण्याचे स्वप्न अधुरेच राहिले असून अकार्यक्षम ठेकेदार, अधिकारीवर्गाचे दुर्लक्ष अशा अनेक कारणांमुळे अनेक ठिकाणी कामे रखडली आहेत. संगमेश्वरच्या दुतर्फा आरवली ते बावनदी या अती अपघातप्रवण क्षेत्रातील काम मंद गतीने सुरू असल्याने वाहनचालकांनी चिंता व्यक्त केली असताना संगमेश्वर येथे १९३७ ला उभारलेल्या सोनवी पुलाला पर्याय म्हणून नवीन पुलाचे काम एबीसी या कंपनीमार्फत अखेर सुरू करण्यात आले होते. तसेच काही दिवसांपूर्वी मशिनरी नदीत घेऊन जाण्यासाठी रस्ता करण्यात आल्यानंतर मात्र प्रत्यक्षात कामाला सुरवात झाली नव्हती.
आरवली ते बावनदीदरम्यान १२ छोटे-मोठे पूल आहेत. वांद्रीजवळ सप्तलिंगी येथे ९ वर्षांपूर्वी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुलांच्या कामांचा आरंभ झाला; मात्र आरंभानंतर वर्षभरातच या पुलासह अन्य पुलांची कामे सलग पाच वर्षे रखडली.
ज्या क्षेत्रात आजवर सर्वाधिक अपघात झाले त्याच ठिकाणी अर्धवट स्थितीत कामे करून अपघात घडण्यास जणू निमंत्रण देण्याची परिस्थिती निर्माण करून ठेवली. पाच वर्षांनंतर रखडलेल्या १२ पुलांची कामे मंदगतीने का होईना सुरू झाली. यामध्ये सप्तलिंगी, कोळंबे, शास्त्रीपूल, गडनदी पूल यांचा समावेश आहे. असे असले तरी संगमेश्वर येथील प्रसिद्ध सोनावी पुलाला पर्याय काय? हा प्रश्न संगमेश्वरवासीयांना नेहमी सतावत होता.
या पुलाचे काम करण्यासाठी माभळेकडून जेसीबीद्वारे खाली रस्ता करून काम सुरू करण्यात आले होते. त्यानंतर हे काम काही दिवस रखडले. मात्र शुक्रवारी मशिनरी आली आहे. पुलाचे काम सुरळीत सुरू व्हावे तसेच दुसऱ्या बाजूला धोका पोहोचू नये म्हणून अखेर बॅरिकेट लावण्यात आली आहेत. एबीसी कंपनीच सोनवी पुलाचे काम करत आहे. सोनवी पुलाला आता ८७ वर्षांनी पर्यायी पूल मिळणार असल्याने संगमेश्वरवासीयांसह वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
--

पुलाला ८७ वर्षे पूर्ण
सोनवी चौकाजवळ असणाऱ्या या पुलाबाबत कोणत्याही हालचाली दिसून येत नव्हत्या. ब्रिटिश सरकारने १९३७ ला उभारलेल्या या पुलाला ८७ वर्षे पूर्ण होऊन गेली. सद्यःस्थितीत हा पूल अवजड वाहने जाताना जोरात हलतो. यामुळे पुलावरून जाणारे पादचारी जीव मुठीत धरून प्रवास करतात.
--

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com