विज्ञानकेंद्रात गणेशपूजन

विज्ञानकेंद्रात गणेशपूजन

२७ (पान ५ साठी, संक्षिप्त)


-rat२२p२१.jpg ः
९७७९६
साडवली ः देवरूख विज्ञानकेंद्र गणेशपूजन करताना सदानंद भागवत.
------
देवरूख विज्ञान केंद्र इमारतीचे गणेशपूजन

साडवली ः देवरूख शिक्षण प्रसारक मंडळ उभारत असलेल्या स्वा. सावरकर चौक, देवरूख येथील विज्ञानकेंद्र इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून, त्याचे गणेशपूजन अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर संस्थेचे अध्यक्ष सदानंद भागवत आणि सुजाता भागवत यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी संस्थेचे मानद अध्यक्ष दिगंबर तथा बाळासाहेब जोशी, अनुराधा जोशी, कार्यवाह शिरीष फाटक, उपाध्यक्ष नेहा जोशी, उपाध्यक्ष कृष्णकुमार भोसले, पांडुरंग भिडे, दीपा प्रभुदेसाई व अनेक संस्था सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी संस्थेला गेली अनेक वर्षे सातत्याने मदत करत असलेल्या प्रकाश वेलणकर आणि मंगल वेलणकर यांचा सत्कार करण्यात आला. शासनाच्या विज्ञान आयोगाकडून लवकरच विज्ञान केंद्रात बसवण्यात येणारी एक्झिबिट्स प्राप्त होणार आहेत. ही एक्झिबिट्स बसवल्यावर विज्ञानकेंद्राचे मान्यवरांच्या हस्ते यथोचित उद्घाटन करण्यात येईल, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सदानंद भागवत यांनी दिली.
---

कशेडी मंदिरात श्री स्वामी पुण्यतिथी

खेड ः दादर येथील श्री स्वामी समर्थ उपासक मंडळाच्यावतीने कशेडी बंगला येथील श्री स्वामी मंदिरात स्वामी पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त विविधांगी धार्मिक कार्यक्रमही पार पडले. या निमित्त श्रीगणेश पूजन, दुग्धाभिषेक, आरती, वसई येथील डॉ. प्रदीप पाठक यांचे कीर्तन आदी कार्यक्रम उत्साहात पार पडले. तसेच श्री स्वामी महाराज महाआरती, महाप्रसादानंतर भडगाव-उसरेवाडी येथील श्रीकृष्ण आदिशक्ती महिलामंडळाचे भजन तसेच पोलादपूर येथील महिला भजन मंडळाच्या भजनाने भाविक मंत्रमुग्ध झाले. शास्त्रीय संगीत विशारद सांची वानखेडे यांचेही संगीतमय भजन झाले. श्री स्वामी महाराजांची आरती व महाप्रसाद झाल्यानंतर उत्सवाची सांगता झाली.
---

खेडमध्ये बीएसएनएलची इंटरनेटसेवा कोलमडली

खेड ः शहरासह ग्रामीण भागात बीएसएनएल मोबाईल कंपन्यांच्या सेवेचा गेल्या काही दिवसांपासून बोजवारा उडाला असून, इंटरनेट सेवा पूर्णतः कोलमडून गेली आहे. त्यात सुट्टीचे दोन सलग दिवस जोडून आल्याने या सेवेत आणखी व्यत्यय निर्माण झाला. गेल्या दोन दिवसांपासून बीएसएनएलच्या सेवेसह नेटसेवा कोमात गेल्याने शासकीय कार्यालयांसह बँकांमधील व्यवहार कोलमडले. त्यात दोन दिवस सुट्टीचे आल्याने या सेवेत आणखी व्यत्यय आला. दिवसभर खंडित होणाऱ्या सेवेमुळे ग्राहक हैराण झाले आहेत. बहुतांश शासकीय कार्यालयांसह बँकांमध्ये बीएसएनएलचीच नेटसेवा आहे. ही नेटसेवाही खंडित होत असल्याने शासकीय कार्यालयांमध्ये कामाचा खोळंबा सुरूच आहे. याशिवाय नेटसेवेअभावी बँकांचे व्यवहारदेखील कोलमडले याचा फटका ग्राहकांना तासनतास कार्यालयातच तिष्ठत बसावे लागले. बीएसएनएलसह खासगी कंपन्यांची मोबाईल सेवाही कोलमडत असल्याने ग्राहकांचा मनस्ताप कायमच आहे. या सेवांमध्ये सुरळीतपणा आणण्यासाठी कोणी पुढाकार घेत नसल्याने ग्राहकांना याचा फटका बसत आहे. बीएसएनएलसह खासगी मोबाईल कंपन्यांनी सेवेत येणारा व्यत्यय दूर करण्यासाठी ठोस पावले उचलली जात नसल्याने ग्राहकांतून संताप व्यक्त होत आहे.
---

कोसुंब-ताम्हाणे रस्त्याच्या कामाचा आरंभ

संगमेश्वर ः कोसुंब-ताम्हाणे रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेच्या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी घेतलेल्या आंदोलनाच्या पवित्र्यामुळे रस्त्याच्या कामाला अखेर आरंभ झाला आहे. या कामामुळे जीव धोक्यात घालून दुचाकीवरून जाणाऱ्या परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
-----

साखरप्यात रमजान ईद उत्साहात साजरी

साखरपा ः संगमेश्वर तालुक्यातील साखरपा भडकंबा येथे रमजान ईद मोठ्या उत्साहात मुस्लिम बांधवांनी साजरी केली. देशातील काही भागात काल शुक्रवारी संध्याकाळी ईद उल् फित्रचा चंद्र दिसला आणि आज साखरपा भडकंबा येथील मुस्लिम बांधवांनी ईद साजरी केली.
मशिदीत नमाज पठण झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांचा गळाभेट घेत ईदीच्या शुभेच्या दिल्या. साखरपा भडकंबा येथील हिंदू मुस्लिम गेली अनेक वर्षे एकोप्याने राहत असून, हिंदू बांधवांनी प्रत्यक्ष व व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून शुभेच्छा देऊन हिंदू-मुस्लिम एकीचे प्रतीक पाहायला मिळाले.
---

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com