धूतपापेश्वर मंदिर परिसर विकासकामांचे आज भूमिपूजन

धूतपापेश्वर मंदिर परिसर विकासकामांचे आज भूमिपूजन

२२ ( पान ५ साठी )


-rat२२p२०.jpg ः
९७७९३
राजापूर ः श्री धूतपापेश्‍वर मंदिराच्या येथील मृडानी नदीवरील धबधबा आणि नरच्या बाजूचे श्रीदत्त मंदिर.
--

धूतपापेश्वर परिसर विकासकामांचे आज भूमिपूजन

११ कोटींची तरतूद ; पालकमंत्री सामंतासह खासदार राऊतही येणार

राजापूर, ता. २२ ः प्राचीन मंदिरांच्या जतन-संवर्धन आणि परिसर विकास कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील प्रसिद्ध श्री देव धूतपापेश्वर मंदिर आणि परिसराच्या विकासासाठी शासनाने ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मंदिर आणि परिसर विकासाच्या कामाचे रविवारी (ता. २३) पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, प्रांताधिकारी वैशाली माने, तहसीलदार शीतल जाधव आदी उपस्थित राहणार आहेत.
तालुक्याचे आराध्य दैवत असलेले श्री देव धूतपापेश्वर हे प्राचीन मंदिर असून, मंदिर आणि लगतचा परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. श्री धूतपापेश्वर मंदिराच्या जतन व संवर्धनासाठी सुमारे ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर असून मंदिराचे जतन संवर्धन व परिसर विकासाचा बृहत्आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ३ विभागात कामे प्रस्तावित करण्यात आली असून मंदिराचा जीर्णोद्धार वा पुर्नबांधकाम करणे, मंदिर परिसरातील पर्यटनाच्या भाविकांच्यादृष्टीने सोयीसुविधा निर्माण करणे व इतर सोयीसुविधा संलग्न कामे करणे आदींचा समावेश आहे. या कामाची काढण्यात आलेली निविदा अंतिम करून नुकतेच कंत्राटदारांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार या कामाचा आरंभ दुपारी १२ वा. होणार आहे.
--

अशा आहेत तरतुदी
प्राचीन मंदिरांचे जतन-संवर्धन आणि परिसर विकास कार्यक्रमांतर्गंत विविध स्वरूपाची कामे करण्यात येणार आहेत. त्यामध्ये श्री धूतपापेश्‍वर मंदिराचा जीर्णोद्धार व पुनर्बांधकाम करण्यासाठी सुमारे अडीच कोटी तर मंदिर परिसराचा जीर्णोद्धार व संवर्धन यासाठी सुमारे सात कोटीं रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मंदिराकडे येणाऱ्‍या मार्गावर भाविकांसाठी आवश्यक दुकान गाळ्यांची बांधणी करणे, मृडानी नदीवरील पुलाचे विद्युतीकरण व सुशोभीकरण करणे, पर्यटक व भाविकांच्यादृष्टीने परिसर विकास व सोयीसुविधांतर्गत विश्रामगृह, प्रसाधनगृहाची पूर्णपणे दुरुस्ती, श्री दत्तमंदिराच्या दर्शनी भागाचे सुशोभीकरण, मंदिर परिसरातील सिमेंट ब्लॉक परसबंदी काढून कातळ दगडात परसबंदी मंदिराच्या प्रवेशद्वारापुढील मार्गाच्या सिमेंट ब्लॉक काढून जांभ्या दगडात परसबंदी करणे आदी कामे प्रस्तावित आहेत. यासाठी सुमारे २ कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com