रामशास्त्रींप्रमाणे न्यायदान करताना धैर्य महत्वाचे

रामशास्त्रींप्रमाणे न्यायदान करताना धैर्य महत्वाचे

३० (पान ५ साठी)

-rat२२p२५.jpg-
९७८१९
ठाणे : बोलताना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक. सोबत अॅड. पाटणे, अॅड. वल्लरी जठार पहिल्या छायाचित्रात तर दुसऱ्या छायाचित्रात वकिल संघटनांना ग्रंथ वितरण करताना न्यायमूर्ती अभय ओक. सोबत ॲड. गजानन चव्हाण, अॅड. विलास पाटणे.
--------------
रामशास्त्रींप्रमाणे न्यायदान करताना धैर्य महत्वाचे

न्यायमूर्ती अभय ओक ; अॅड. पाटणे लिखित रामशास्त्री चरित्राचे वितरण

रत्नागिरी, ता. २२ : न्यायदान करताना केवळ बुद्धिमत्ता असून चालत नाही तर त्याच्या जोडीला धैर्य असणे गरजेचे आहे. जे रामशास्त्रीनी त्या काळात दाखवले होते, त्याला तोड नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी ठाणे येथील टाऊनहॉलमध्ये मांडले. ज्येष्ठ वकील व लेखक विलास पाटणे यांनी लिहिलेल्या रामशास्त्री या चरित्रग्रंथ वकील संघटनाना न्या. ओक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
ॲड पाटणे यांनी अनेक संदर्भ देवून रामशास्त्रीबाणा विषद केला आहे. न्यायव्यवस्थेतील रामशास्त्री हा आमच्यासमोर सर्वोच्च आदर्श आहेत. बार कौन्सिलने संघटनांना पुस्तके देण्याचा घेतलेला निर्णय उचित आहे. परंतु रामशास्त्री केवळ वाचून चालणार नाही, तर त्यांच्या जीवनाचे अनुकरण केले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ सतरा वर्षांचे रांझ्याच्या पाटलाला एका स्त्रीची छेड काढली म्हणून अत्यंत कठोर शिक्षा सुनावली होती. असे सांगून न्या. ओक म्हणाले, रामशास्त्रीनीही अत्यंत निस्पृहपणे आपली भूमिका बजावली. सत्तेपुढे न झुकता त्यांनी न्यायनिवाडा केला. २४ एप्रिलला बरोब्बर ५० वर्षांपूर्वी केशवानंद भारती प्रकरणाचा निकाल आला होता. या निकालाचे दाखले नंतर अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये वेळोवेळी दिले गेले, असे न्या. ओक म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला अॅड. विलास पाटणे यांनी शास्त्रानुसार न्याय होईल अणि न्यायव्यवस्थेला नाती मंजूर नसतात ही रामशास्त्री यांची भूमिका स्पष्ट केली. अॅड. वल्लरी जठार यांनी पुस्तकासंदर्भात मनोगत व्यक्त केले. या वेळी ॲड. गजानन चव्हाण यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com