राजापूर ः 36 लाखांची योजना, 36 लिटरही नाही मिळाले पाणी

राजापूर ः 36 लाखांची योजना, 36 लिटरही नाही मिळाले पाणी

योजना ३६ लाखांची, पाणी ३६ लिटरही नाही!

कोंढेतडची व्यथा; १ मे रोजी ग्रामस्थांचा उपोषणाचा एल्गार

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २२ ः शहरानजीकच्या कोंढेतड येथे ग्रामस्थांना घरोघरी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी राष्ट्रीय पेयजल योजनेतून सुमारे ३६ लाख रुपयांची नळपाणी योजना राबवण्यात आली आहे. या योजनेचे काम पूर्ण झाले असले, तरी अद्यापही ग्रामस्थांना ३६ लिटरही पाणीपुरवठा झालेला नाही. मग ही नळपाणी योजना नेमकी कशासाठी आणि कोणासाठी? अशा शब्दांमध्ये ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, त्या विरोधात कोंढेतड ग्रामस्थांनी १ मे रोजी उपोषणाचा इशारा दिला आहे.
दरम्यान, नळपाणी योजनेविरोधात ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिलामुळे संबंधित गटविकास अधिकारी सुहास पंडित यांच्या उपस्थितीत बुधवारी (ता. २६) सायंकाळी ३ वाजता कोंढेतड ग्रामस्थांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीमध्ये घरोघरी पाणीपुरवठा होण्याच्यादृष्टीने कोणते नियोजन होणार? याकडे आता साऱ्‍यांचे लक्ष लागून राहिले आहे. तत्पुर्वी, नळपाणी योजना असूनही लोकांना घरोघरी पाणीपुरवठ्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. याबाबत तीव्र संताप व्यक्त करताना कोंढेतड ग्रामस्थांनी १ मे रोजी उपोषणाचा इशारा दिला असून, याबाबतचे पत्र कोंढेतड ग्रामपंचायतीने पंचायत समितीला लेखी निवेदन दिले आहे.
-----------------------
कोट
सुमारे ३६ लाख रुपयांचा निधी असलेल्या या योजनेतून कोंढेतड ग्रामस्थांना ३६ लिटरही पाणीपुरवठा झालेला नाही. मग या नळपाणी योजनेची उभारणी नेमकी कोणासाठी? या साऱ्‍या प्रकाराची सखोल चौकशी व्हावी आणि कोंढेतड ग्रामस्थांना घरोघरी पाणीपुरवठा व्हावा अन्यथा उपोषणावर आम्ही ग्रामस्थ ठाम आहोत.
- अरविंद लांजेकर, माजी उपसरपंच, कोंढेतड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com