बस खाईत कोसळून वेत्येत दोघे जखमी

बस खाईत कोसळून वेत्येत दोघे जखमी

97842
वेत्ये ः अपघातग्रस्त बस.

बस खाईत गेल्याने
वेत्येत दोघे जखमी
सावंतवाडी, ता. २२ ः मुंबई-गोवा महामार्गाच्या झाराप-पत्रादेवी बायपासवर वेत्ये येथे कैलाश धाब्यानजीक खासगी बस चालकाचा ताबा सुटल्यामुळे बस रस्त्यालगतच्या खाईत कोसळली. या अपघातात चालकासह वाहक जखमी झाला. हा अपघात काल (ता. २२) मध्यरात्री एकच्या सुमारास झाला.
अपघाताची माहिती मिळताच वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अपघातग्रस्तांना मदतकार्य केले. संबंधित बस गोवा ते मुंबई असा प्रवास करीत होती. जखमी चालक व वाहकाला उपचारासाठी येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात बसचेही मोठे नुकसान झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com