रत्नागिरी- विद्यार्थ्यांसाठी रंगला छंद वर्ग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- विद्यार्थ्यांसाठी रंगला छंद वर्ग
रत्नागिरी- विद्यार्थ्यांसाठी रंगला छंद वर्ग

रत्नागिरी- विद्यार्थ्यांसाठी रंगला छंद वर्ग

sakal_logo
By

परशुरामपंत अभ्यंकर विद्यामंदिरमध्ये
विद्यार्थ्यांसाठी रंगला छंद वर्ग
रत्नागिरी, ता. २४ : येथील परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्यानंतर छंद वर्गाचे आयोजन केले. यात विद्यार्थ्यांनी अभिनयाचे धडे गिरवले, कला सादर केली. गायनही शिकले. कथाकथनाचा आनंदही घेतला.
छंद वर्गामध्ये श्रीमती धनश्री पालांडे, नेहा उकीडवे यांनी विद्यार्थ्यांना बोधकथा सांगितल्या. कुमारी श्वेता केळकर यांनी विद्यार्थ्यांना वारली पेंटिंग शिकवले व विद्यार्थ्यांकडून करून घेतले तसेच ओरिगामी शिकवले. माजी विद्यार्थी संगीत शिक्षक श्रीधर पाटणकर यांनी विद्यार्थ्यांना संगीत कलेची ओळख करून दिली व स्वतः गायन करून विद्यार्थ्यांकडून गाणी म्हणून घेतली. बालरंगभूमीचे सल्लागार, रंगकर्मी अनिल दांडेकर यांनी विद्यार्थ्यांना अभिनयाचे धडे दिले. विद्यार्थ्यांकडून अभिनय करून घेतला. त्यांना अस्मिता सरदेसाई व सीमा कदम यांनी सहकार्य केले.
विद्यार्थ्यांना बाल चित्रपट दाखवण्यात आले. विविध गुणदर्शन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कला सादर केली. निवृत्त शिक्षक दिगंबर साठे यांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले. सहा दिवस छंद वर्ग विनामूल्य घेण्यात आला. परीक्षेनंतर मुक्त वातावरणात विद्यार्थ्यांनी छंद वर्गाचा आस्वाद घेतला. याकरिता मुख्याध्यापक विनोद नारकर, संस्थेच्या कार्याध्यक्ष सुमिता भावे व सहकारी शिक्षक यांनी मेहनत घेतली.