गाबीत समाज महोत्सव ऐक्यासाठीच

गाबीत समाज महोत्सव ऐक्यासाठीच

99297
मालवणात ः गाबीत महोत्सवात ज्येष्ठ दशावतार कलावंत जीजी चोडणेकर यांना ‘गाबीत भूषण’ पुरस्कार देण्यात आला.

गाबीत समाज महोत्सव ऐक्यासाठीच

परशुराम उपरकर; मालवणात थाटात प्रारंभ, विविध कार्यक्रमांचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २८ : गाबीत समाजातील अनेक बांधव आज विविध क्षेत्रांत उच्च पदांवर कार्यरत आहेत. विखुरलेल्या समाजबांधवांना एकत्र आणण्यासाठी आजचा महोत्सव आयोजित केला असून गाबीत बांधवांनी एका झेंड्याखाली एकत्र यावे, असे आवाहन अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केले.
अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ, महाराष्ट्र राज्य गाबीत समाज व सिंधुदुर्ग जिल्हा गाबीत समाज यांच्यावतीने मालवणच्या दांडी समुद्रकिनारी आयोजित गाबीत महोत्सवाचा प्रारंभ गुरुवारी (ता. २७) सायंकाळी भव्य दुचाकी रॅली व दांडी किनाऱ्यावरून शोभायात्रा काढून करण्यात आला. दांडी येथील महोत्सवस्थळी मान्यवरांच्या हस्ते गाबीत ज्योत प्रज्वलित करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि अखिल भारतीय गाबीत महासंघाचे अध्यक्ष उपरकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या महोत्सवाचे उद्‍घाटन करण्यात आले.
व्यासपीठावर अखिल भारतीय गाबीत महासंघाचे कार्याध्यक्ष दिगंबर गावकर, सरचिटणीस वासुदेव मोंडकर, माजी अध्यक्ष काशिनाथ तारी, महाराष्ट्र गाबीत महासंघाचे अध्यक्ष सुजय धुरत, सचिव गणपत मणचेकर, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, सचिव महेंद्र पराडकर, कारवार गाबीत समाज अध्यक्ष राम जोशी, गाबीत समाज गोवाचे माजी अध्यक्ष विश्वनाथ हळणकर, गाबीत समाज रत्नागिरीचे माजी अध्यक्ष सुधीर मोंडकर, मालवण अध्यक्ष डॉ. प्रमोद कोळंबकर, वेंगुर्ले अध्यक्ष दिलीप गिरप, देवगड अध्यक्ष संजय पराडकर, सावंतवाडी अध्यक्ष अॅड. संदीप चांदेकर, देवगड नगराध्यक्ष साक्षी प्रभू, जिल्हा कार्यवाह बाबासाहेब मोंडकर, जिल्हा खजिनदार सहदेव बापर्डेकर, जिल्हा संघटक रविकिरण तोरसकर, सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, मेघनाद धुरी, स्वागत समिती अध्यक्ष अन्वय प्रभू, माजी जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, श्रमिक मच्छिमार संघांचे अध्यक्ष छोटू सावजी, श्रमजीवी रापण संघाचे अध्यक्ष दिलीप घारे, अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती अध्यक्ष मिथुन मालंडकर, राजा गावकर, बाबी जोगी, माजी नगरसेविका सेजल परब, पूजा सरकारे, दर्शना कासवकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, सौरभ ताम्हणकर, सतीश आचरेकर, स्नेहा केरकर, संजय केळूसकर, पंकज सादये, नारायण कुबल, नरेश हुले, संमेश परब, नारायण धुरी, भाई कुबल, उल्हास तांडेल, विकी चोपडेकर, दांडी गाव अध्यक्ष नीलेश कांदळगावकर, जगदीश खराडे, आप्पा पराडकर, रुपेश खोबरेकर आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर यांनी केले. यावेळी ज्येष्ठ दशावतार कलाकार जीजी चोडणेकर, बाळ जुवाटकर, श्री. कालमित्र (कालमेतर), अमृता जोशी यांना ‘गाबीत भूषण’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आचरा-मुंबई येथील उद्योजक सचिन कुबल, जादूगार विनयराज (विनय उपरकर) डॉ. निशा धुरी यांच्यासह व्यासपीठावरील उपस्थितांचा सन्मान करण्यात आला. इतिहास संशोधक डॉ. अमर आडके यांचे ‘गाबीत समाज व शिवकाल’ या विषयावर व्याख्यान झाले. आचरा व देवगड कट्टा येथील गाबीत बांधवांचे शिमगा व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. दिनेश कोयंडे व ज्योती तोरसकर यांनी सूत्रसंचालन केले.
--
विविध प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दारी
माजी आमदार उपरकर म्हणाले, ‘‘गाबीत समाजाच्या विविध प्रश्नांबाबत मी मुख्यमंत्र्यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. गाबीत समाजाला कामगारांचा दर्जा द्यावा, काही जातीप्रमाणे केवळ सरपंच अथवा पोलिसपाटील यांच्या दाखल्यावरून गाबीत बांधवांना जातीचा दाखला द्यावा, देवगड येथे होणाऱ्या गाबीत भवनासाठी मुख्यमंत्री फंडातून निधी मिळावा, अशा मागण्या मुख्यमंत्र्यांकडे केल्या आहेत.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com