आगामी निवडणुकांसाठी सज्ज व्हा

आगामी निवडणुकांसाठी सज्ज व्हा

99301
ओरोस ः सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस प्रभारी शशांक बावचकर यांचे स्वागत करताना इर्शाद शेख. सोबत विकास सावंत, साईनाथ चव्हाण, साक्षी वंजारी, अरविंद मोंडकर आदी उपस्थित होते.

आगामी निवडणुकांसाठी सज्ज व्हा

शशांक बावचकर; ओरोसमध्ये काँग्रेसच्या सभेत आवाहन

कुडाळ, ता. २९ ः सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत संघटना बळकटीकरणासह आगामी निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांनी झोकून काम करावे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे प्रभारी शशांक बावचकर यांनी केले. जिल्हा काँग्रेसची सभा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रभारी बावचकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ओरोस येथे नुकतीच झाली. सभेत संघटनेचा आढावा घेण्यात आला.
येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, वेंगुर्ले, मालवण, सावंतवाडी नगरपरिषद तसेच कणकवली नगरपंचायत निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली. निवडणुकांच्या संदर्भात व जिल्ह्यातील काँग्रेस संघटना बळकट करण्यासाठी जिल्ह्याचे प्रभारी बावचकर, माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत आणि जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा प्रभारी बावचकर यांनी फ्रंटल ऑर्गनायझेशन व इतर विभाग बळकट करून काँग्रेसला जिल्ह्यात उभारी देण्यासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण, महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष महेश उर्फ बाळू अंधारी, देवगड तालुकाध्यक्ष उमेश कुलकर्णी, कणकवली तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, विभावरी सुकी, अमिदी मेस्त्री, रोजगार व स्वयंरोजगार विभाग जिल्हाध्यक्षा सुंदरवल्ली पडियाची, कोकण विभाग मीडिया समन्वयक केतन गावडे, जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, प्रवीण वरूनकर, उल्हास मणचेकर, रवींद्र म्हापसेकर, बाळा धाऊसकर, सुमेधा सावंत, माया चिटणीस, अशोक राणे, प्रकाश डिचोलकर, आत्माराम उर्फ दादा सोकटे, समीर वंजारी, आनंद परुळेकर, सरदार ताजर, जस्मीन लक्शमेश्वर, हेमंत माळकर, अमित मांडवकर, रुपेश साळुंखे, अहमद बोबडे, गौस बोबडे, खलील रमदूल, सर्फराज बोबडे तसेच वक्ता प्रशिक्षणासाठी आलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस वक्ता विभागाचे सरचिटणीस भारत यात्री व गणेश रेड्डी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com