मोटार विक्रीप्रकरणी
संशयितास जामीन

मोटार विक्रीप्रकरणी संशयितास जामीन

मोटार विक्रीप्रकरणी
संशयितास जामीन

ओरोस, ता. २९ ः मुंबई येथील एका व्यक्तीची मोटार भाडेतत्त्वावर सिंधुदुर्ग येथे आणून ती बनावट कागदपत्रे बनवून परस्पर विक्री केल्याप्रकरणी संशयित विक्रम प्रकाश मोरजकर (रा. सुकळवाड) याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने १५ हजारांचा सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. संशयितातर्फे अॅड. यतिश खानोलकर, अॅड. अविनाश परब यांनी काम पाहिले.
ठाणे येथील शिवाजी सुभाष काळे यांनी त्यांच्या मालकीची मोटार गौरव धुरी यांनी भाडेतत्त्वावर मुंबई येथून कुडाळ येथे आणली होती. त्यानंतर धुरी यांनी ती आपल्या संमतीशिवाय परस्पर कोल्हापूर येथे त्रयस्थ व्यक्तीला विकल्याने आपली फसवणूक झाल्याची तक्रार कुडाळ पोलिसांत काळे यांनी दिली होती. त्यानुसार संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. यात धुरी यांनी मोरजकर यांना दिल्याचे व त्यांनी ती मोटार कोल्हापूर येथे विक्री केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याने कुडाळ पोलिसांनी संशयित मोरजकर यांच्यावर या गुन्ह्यात सामील असल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी मोरजकर यांनी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर सुनावणी होऊन सशर्त जामीन मंजूर करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com