सातोसेत उद्यापासून धार्मिक कार्यक्रम

सातोसेत उद्यापासून धार्मिक कार्यक्रम

सातोसेत उद्यापासून धार्मिक कार्यक्रम
सावंतवाडी ः सातोसे-रेखवाडी येथील श्री वसदेव मंदिर जीर्णोद्धार कलशारोहण व मूर्ती पुनःप्रतिष्ठापना सोहळा १ ते ३ मे दरम्यान आयोजित केला आहे. सोमवारी (ता. १) सकाळी धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद, रात्री नऊला प्रसिद्ध कीर्तनकार रामचंद्र उर्फ किरण तुळपुरे यांचे सुश्राव्य कीर्तन, मंगळवारी सकाळी धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद आणि रात्री समीर गावडे व अभिषेक शिरसाट यांचा डबलबारी भजनाचा जंगी सामना होणार आहे. बुधवारी सकाळी आठला धार्मिक विधी, शिखर कलश स्थापना, मूर्ती पुनःप्रतिष्ठापना, दुपारी महाप्रसाद आणि रात्री मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव कला, क्रीडा मंडळ निर्मित श्री जगदीश तळवी लिखित व श्री साबा चारी दिग्दर्शित तीन अंकी नाट्यकृती ‘लावणी भुलली अभंगाला’ नाट्यप्रयोग, गुरुवारी (ता. ४) श्रींची महापूजा होणार आहे. उपस्थित राहावे, असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.
--
सावंतवाडी येथे वस्तू प्रशिक्षण
सावंतवाडी ः येथील कामगार कल्याण केंद्रात वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हा प्रशिक्षण वर्ग २ ते २० मे या कालावधीत येथील जिमखाना मैदान परिसरातील पालिकेच्या इमारतीत घेण्यात येणार आहेत. जास्तीत-जास्त लाभार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन केंद्रप्रमुख नम्रता आराबेकर यांनी केले आहे. येथील कामगार कल्याण केंद्रामार्फत विविध प्रकारची फुले, टेडीबेयर, कुत्रा, सिंड्रेला बाहुली बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. जिमखाना मैदानावरील नगरपालिकेच्या इमारतीत हे वर्ग सुरू होणार आहेत. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केंद्र प्रमुखांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com