पल्लिनाथ मंदिराचा वर्धापन दिन

पल्लिनाथ मंदिराचा वर्धापन दिन

२ (पान ६ साठी, संक्षिप्त)

श्री पल्लिनाथ मंदिराचा आज वर्धापनदिन

रत्नागिरी ः तालुक्यातील पाली पाथरट गावचे ग्रामदैवत श्री पल्लिनाथ व श्री करंबेळदेव मंदिर जीर्णोद्वाराचा १४वा वर्धापनदिन रविवारी (ता. ३०) एप्रिल व १ मे रोजी पाली येथे होणार आहे. या निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ३० ला श्री पल्लिनाथ मंदिरात सकाळी लघुरूद्र अभिषेक, दुपारी १२ वा. नैवेद्य, आरती, १२.३० वा. मंदिराभोवती ढोलताशांच्या गजरात भोवत्या व १.३० वा. महाप्रसाद, रात्री ९ वा. स्थानिक भजनाचा कार्यक्रम होईल. १ मे रोजी श्री करंबेळदेव मंदिरात श्रींच्या मूर्तीवर लघुरूद्राभिषेक, दुपारी १२ वा. नैवेद्य, आरती, १२.३० वा. मंदिराभोवती ढोलताशांच्या गजरात प्रदक्षिणा, १.३० वा. महाप्रसाद व रात्री ८.३० वा. सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. तरी सर्व भाविकांनी धर्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री लक्ष्मीपल्लिनाथ देवस्थानचे मुख्य मानकरी व अध्यक्ष संतोष सावंत-देसाई यांनी केले आहे.
--

निवृत्ती वेतनधारकांसाठी नवीन आयकर प्रणाली

रत्नागिरी ः नवीन आयकर प्रणालीनुसार आता निवृत्ती वेतनधारकांना काही नवीन बदल स्वीकारावे लागणार आहेत. सात लाखापेक्षा जास्त निवृत्ती वेतन मिळवणाऱ्यांना आयकर कपातीत समोरे जावे लागणार आहे. अशा निवृत्ती वेतनधारकांना जर जुनी आयकर प्रणाली लागू करून घेण्यासाठी आता कोषागार विभागात अर्ज करणे आवश्यक आहे. २०२३-२४ पासून नवीन आयकर प्रणाली लागू करण्यात आली हे. जे निवृत्ती वेतनधारक आयकर कपातीस पात्र आहेत. (ज्यांचे वार्षिक निवृत्ती वेतन ७ लाखापेक्षा अधिक आहे असे निवृत्ती वेतनधारक) अशा निवृत्ती वेतनधारकांच्या नियमानुसार, आयकर कपात त्यांच्या निवृत्ती वेतनातून माहे मे २०२३ पासून सुरू करण्यात येणार आहे. ज्या निवृत्ती वेतनधारकांना जुनी आयकर प्रणाली स्वीकारायची आहे त्यांनी चालू आर्थिक वर्षासाठी २०२३-२४ केलेल्या गुंतवणुकीच्या तपशिलासह जुनी आयकर प्रणाली स्वीकारण्याबाबतचा लेखी अर्ज जिल्हा कोषागार कार्यालयाकडे सादर करणे गरजेचे आहे. निवृत्ती वेतनधारकांनी आपली आयकर माहिती कोषागारास सादर करून सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
-

रंगशाळा विद्यालयातर्फे महिलांसाठी अभिनय कार्यशाळा

रत्नागिरी ः महिलांनी आपलं दैनंदिन काम करत स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करू पाहणाऱ्या प्रत्येक महिलांसाठी शहरातील बाळकृष्ण नगर, नाचणे रोड येथील रंगशाळा विद्यालयात अभिनय कौशल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा १ ते ६ मे या कालावधीत सायं. ४ ते ७ या वेळेत होणार आहे. तुमच्या मनातल्या अभिनयाचा तथाकथित अर्थ बदलून टाकणारी ही कार्यशाळा आहे. आपल्या जगण्यातल्या प्रत्येक घटकात नाट्य वा ॲक्ट आहे. याचा कौशल्यपूर्ण वापर आपलं व्यक्तिमत्व पूर्ण बदलून टाकू शकतोच वर जादाचा इन्कमही मिळवू शकतो. खासकरून गृहिणींनी याकडे फार कमी लक्ष दिलेलं असतं. आता महिलांनी हा घटक विकसित करायची वेळ आली आहे. या कार्यशाळेमुळे डिजिटल जगात आपली स्वतःची ओळख निर्माण करता येईल, आपल्याच कौशल्यपूर्ण व्हिडिओज् मधून जादाचा इन्कम कमवता येईल, टीव्ही सिनेमाक्षेत्रात संधी शोधता येईल, अत्यंत कमी खर्चात स्वतःचे शूटिंग युनिट बनवता येईल. संभाषण कौशल्य, मंचावर, कॅमेऱ्यासमोरील सहज व्यवहार आदी अनेक गोष्टींचे मुलभूत ज्ञान देणारी ही कार्यशाळा असून इच्छूक महिलांनी १ मे पूर्वी नोंदणी करणे आवश्यक आहे अधिक माहितीसाठी रंगशाळा विद्यालयाचे प्रशिक्षक प्रदीप शिवगण यांच्याशी संपर्क साधावा.
-

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com