‘स्टॉल हटाओ’ला कणकवलीत विरोध

‘स्टॉल हटाओ’ला कणकवलीत विरोध

99319
कणकवली : शहरातील उड्डाणपुलाखाली आज स्टॉल हटाओ मोहीम सुरू करण्यात आली; मात्र नंतर ती थांबविण्यात आली. (छायाचित्र : प्रथमेश जाधव)


‘स्टॉल हटाओ’ला कणकवलीत विरोध

उड्डाणपुलाखाली पोलिस बंदोबस्त; आताच कारवाई का? ः मेस्त्री

कणकवली, ता.२९ : शहरात उड्डाणपुलाखाली आज दुपारनंतर स्टॉल हटाव मोहीम सुरू करण्यात आली होती; मात्र कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांनी या मोहिमेला आक्षेप घेतला. त्‍यानंतर ही कारवाई थांबवण्यात आली. महामार्ग प्रशासनाने गेल्‍या चार वर्षांत उड्डाणपुलाखाली काय करणार ते जाहीर केलेले नाही. त्‍यानंतर आज अचानक कारवाई कशासाठी? असा सवाल श्री.मेस्त्री यांनी यावेळी केला.
कणकवली शहरातील उड्‍डाणपुलाखालील दोन महिन्यांपूर्वी महामार्ग विभागाने स्टॉल हटाओ मोहीम राबवली होती. यात नरडवे नाका ते एस.एम. हायस्कूल या भागातील उड्डाणपुलाखालील सर्व स्टॉल हटवले होते. त्‍यानंतर गेल्‍या दोन महिन्यात लाकडी बांबू रोवून काही ठिकाणी पुन्हा स्टॉल लावण्यात आले होते. ते हटविण्यासाठी दुपारी साडेबारा वाजल्‍यानंतर पुन्हा हे स्टॉल हटविण्याची कारवाई सुरू झाली. यामुळे विक्रेत्‍यांमध्ये पळापळ सुरू झाली. या दरम्‍यान कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांनी पटवर्धन चौकात स्टॉल हटाव कारवाईला विरोध केला. उड्डाणपुलाखालील गोरगरीब विक्रेते आपला व्यवसाय करत आहेत. त्‍यांच्यावर कारवाई नको असे श्री.मेस्त्री म्‍हणाले.
---
चार वर्षांत काहीच केले नाही?
महामार्ग उभारणी पूर्ण झाल्‍यानंतर चार वर्षांत उड्डाणपुलाखालील उद्यान किंवा अन्य कोणतेही उपक्रम महामार्ग विभागाने राबवलेले नाहीत. आता स्टॉल हटवून पुलाखाली गार्डन किंवा अन्य काही करणार आहात का? त्‍याबाबतची माहिती द्या त्‍यानंतरच स्टॉल हटावा, अशी भूमिका संदीप मेस्त्री यांनी मांडली. त्‍यानंतर काही स्टॉलधारकांनी हटाओ मोहिमेला विरोध केला. त्‍यामुळे तातडीने ही मोहीम थांबविण्यात आली; मात्र शहरातील पटवर्धन चौकात तसेच उड्डाणपुलाखालील मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com