आजगावात इंग्रजी व्याकरण वर्गास प्रतिसाद

आजगावात इंग्रजी व्याकरण वर्गास प्रतिसाद

99352
आजगाव ः इंग्रजी मार्गदर्शन वर्गातील सहभागी विद्यार्थ्यांसह शिक्षक वर्ग.

आजगावात इंग्रजी व्याकरण वर्ग

१८ जणांचा सहभाग; गोगटे गुरुजी स्मृती प्रतिष्ठानचा उपक्रम

सावंतवाडी, ता. २९ ः आजगाव येथील गोगटे गुरुजी स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित पाचवी ते सातवीसाठीच्या इंग्रजी व्याकरण मार्गदर्शन वर्गाचा सांगता कार्यक्रम आजगाव मराठी शाळेत नुकताच झाला. हा कार्यक्रम प्रतिष्ठानचे समन्वयक विनय सौदागर व शाळेच्या मुख्याध्यापिका ममता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
शाळेतील शिक्षक दत्तगुरू कांबळी यांनी प्रास्ताविक केले. दोन महिन्यांत केलेल्या मार्गदर्शन वर्गात सहभाग घेतलेल्या अठरा विद्यार्थ्यांना ‘इंग्रजी-मराठी शब्दकोश’ भेट देऊन गौरविण्यात आले. हे शब्दकोश प्रतिष्ठानच्या विजया आजगावकर-वाडकर यांनी पुरस्कृत केले. मार्गदर्शन वर्गादरम्यान घेतलेल्या परीक्षेत यश मिळविलेल्या प्रथम तीन क्रमांकांना पारितोषिके देण्यात आली. प्रथम तीन विजेते खुशी जाधव, गंधार गवंडे व शुभम सावळ यांना रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. समन्वयक विनय सौदागर यांनी या शैक्षणिक कार्याची महती विशद केली. पुढील वर्षीही शाळेत शिष्यवृत्ती मार्गदर्शन, इंग्रजी व्याकरण व सायन्सचे मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पालकांच्यावतीने शहानूर शेख उपस्थित होत्या. मार्च-एप्रिल मधील या मार्गदर्शन वर्गाचा खुशी परब, किंजल मयेकर, साक्षी सुतार, मानसी पांचाळ, गौतम जाधव, शुभम सावळ, सानिया शेख, संचित पांढरे, वैभव पांढरे, गंधार गवंडे, तन्वी पांढरे, प्रभाकर मोरजकर, आयान शेख, विष्णू कळसुलकर, दिशा जाधव, दिया सावंत, साहिल भागीत, खुशी जाधव या विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. या शैक्षणिक वर्षांत प्रतिष्ठानने केलेल्या सहकार्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. पुढील वर्षांतही सहाय्य करण्याची विनंती शाळेतर्फे मुख्याध्यापिका जाधव यांनी केली. शिक्षक कांबळी यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी शिक्षक निंगोजी कोकीतकर, रुपाली नाईक आणि स्वयंसेविका आरोलकर यांचे सहाय्य लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com