100 व्या मन की बातचे प्रसारण

100 व्या मन की बातचे प्रसारण

१२ (पाना ६ साठी)

१०० व्या मन की बातचे प्रसारण

रत्नागिरी, ता. २९ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचा १०० वा भाग उद्या (ता. ३०) प्रसारित होणार आहे. रत्नागिरी तालुक्यात भाजपा मंडलातर्फे सर्व ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याची जबाबदारी गावनिहाय, बूथनिहाय देण्यात आली आहे. मन की बातचे प्रसारण कार्यकर्त्यांसह जनतेसाठीसुद्धा होणार आहे.
दक्षिण रत्नागिरी भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांच्या सूचनेनुसार रत्नागिरी भाजपा तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, तालुका सरचिटणीस उमेश कुळकर्णी यांनी या कार्यक्रमांची जबाबदारी स्थानिक बूथकडे दिली असून ठिकठिकाणी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. धामणसे गावामध्ये यानिमित्त रांगोळी, चित्रकला, निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
रत्नागिरी तालुक्यात पोमेंडी खुर्द- गिरीधर पटवर्धन, टिके- भाई दळी, राजा सांडीम, गुरू गोविलकर, चांदेराई- महेश गांगण, गणेशगुळे- संदीप शिंदे, प्रज्योत गुळेकर, नाचणे- संकेत कदम, ओमकार फडके, निवळी- विनय मुकादम, पिंट्या निवळकर, वेतोशी- चंद्रकांत भावे, सुरेश कांबळे, धामणसे- अमर रहाटे, अनंत जाधव, राजेंद्र डाफळे, ओरी- उमेश देसाई, कोतवडे- स्वप्नील बारगुडे, आशिष धूंदूर, नेवरे- कौशल मोरे, तरवळ- विजय माचीवले, रीळ- मिलिंद वैद्य, कुवारबाव- दीपक आपटे, नीलेश लाड, बसणी- बबन शिंदे, शिरगाव- स्नेहा चव्हाण, कासारवेली- सुवरे, जांभारी- नंदू बेंद्रे, भोके- विजय मायगडे, फणसवळे- संतोष आंबेकर, दांडेआडम- शंकर तुळसणकर, मालगुंड- अवधूत केळकर, सचिन दुर्गवळी, गणपतीपुळे- अभिजित घनवटकर, भाट्ये- सुशील भाटकर, राकेश भाटकर, करबुडे- सदाशिव पाचकुडवे, कारवांचीवाडी- गजानन धनावडे, देऊड- किसन घाणेकर, पिरंदवणे- श्रीकांत मांडवकर, विजय बेहेरे, पावस- अशोक वाडेकर, अनिल पावसकर, गावडेआंबेरे- लक्ष्मण सारंग, बंड्या आडीवरेकर, पूर्णगड- प्रवीण पाथरे, प्रकाश पवार, दामोदर लोकरे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com