महाराष्ट्र दिन विविध कार्यक्रम

महाराष्ट्र दिन विविध कार्यक्रम

११ (पान ५ साठी, संक्षिप्त)

महाराष्ट्र दिनानिमित्त कडवईत येथे विविध कार्यक्रम

संगमेश्वर ः तालुक्यातील कडवई येथे सोमवारी (ता. १) मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून रिक्षामालक चालक संघटना कडवई-तुरळ-चिखली यांच्यावतीने कडवई बाजारपेठ येथे सत्यनारायण महापुजेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी केले आहे. रिक्षामालक-चालक संघटना कडवई-तुरळ चिखली यांच्यावतीने गेल्या १७ वर्षांपासून प्रतिवर्षी महाराष्ट्रदिनी कडवई बाजारपेठ येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी १ मे रोजी सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते रात्री ९ तीर्थप्रसाद, दुपारी १२ ते ३ महाप्रसाद, ३.३० ते ५ भजन तर सायं. ५ ते ६.३० विश्वकर्मा भजन मंडळ कडवई सुतारवाडी यांच्या भजनाचा कार्यक्रम होईल. सायं. ६.३० ते रात्री ८ श्री चण्डिकादेवी प्रासादिक भजन मंडळ शिंदेंआंबेरी यांचा हरिपाठ, रात्री १० वा. श्री समर्थ नाट्यगंधा प्रस्तुत यशवंत माणके लिखित रिक्षा संघटना निर्मित दोन अंकी नाटक ‘माझं काय चुकलं?’ हे रिक्षा संघटनेचे कलाकार सादर करतील. या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेच्यावतीने अध्यक्ष मिलिंद चव्हाण व सचिव मोहन ओकटे यांनी केले आहे.
--

पाटपन्हाळे विद्यालयात इंग्रजी भाषा दिन साजरा

गुहागर ः तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे या विद्यालयात इंग्रजी भाषा दिन नुकताच साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम मुख्याध्यापक एम. ए. थरकार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या कार्यक्रमानिमित्त विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेमधून कविता, विविध विषयांवरील माहिती, इंग्रजी भाषेतील प्रसिद्ध कवी व नाटककार विल्यम शेक्सपियर यांच्याबद्दल माहिती सादर केली. विद्यालयातील मीरा कोलकांड हिने शेक्सपियर यांचे रेखाटलेले चित्र व सादर केलेली माहिती कार्यक्रमात विशेष आकर्षण ठरली. कार्यक्रमाचे अध्यक्ष थरकार यांच्या हस्ते इंग्रजी साहित्यिक, कवी, नाटककार शेक्सपियर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा आरंभ करण्यात आला. पाचवी ते नववीमधील भक्ती दीक्षित, पुनम मोहिते, पूर्वा माळी, शमिका भिडे, सार्थक मेस्त्री, मृण्मयी जाधव, मीरा कोलकांड या विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेमधून कविता, विविध विषयांवरील माहिती, इंग्रजी भाषा दिनाचे महत्व, इंग्रजी भाषाविषयक साहित्यिक, कवी, नाटककार शेक्सपियर यांचा जीवनपरिचय या विषयांबाबत माहिती सादर केली.
---

डोर्लेत अभाविपचे ११ मे पासून क्षितिज उन्हाळी शिबिर

रत्नागिरी ः अखिल भारतीय विद्यार्थी परिषद दक्षिण रत्नागिरी यांच्यावतीने तालुक्यातील निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या डोर्ले गावात ११ ते १३ मे या कालावधीत क्षितिज उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात फनी गेम्स, जंगल कुकिंग, कॅम्प फायर, ट्रेजर हंट, टीम बिल्डिंग गेम्स इत्यादी अनेक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. शिबिराच्या नावनोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी अभाविपच्या आजगावकरवाडी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येथे संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

-----
पोचरी धामणेवाडीमध्ये महाराष्ट्रदिनी रक्तदान शिबिर

रत्नागिरी ः संगमेश्वर तालुक्यातील पोचरी धामणेवाडी येथील श्री शिमरादेवी ग्रामविकास मंडळातर्फे महाराष्ट्र दिनी १ मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. समाजसेवेचे भान राखत श्रेष्ठदान असलेल्या रक्तदानाचे प्रथमच आयोजन केले आहे. हे शिबिर वामन गोविंद पटवर्धन हायस्कूल येथे १ मे रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत होणार आहे. यामध्ये पोचरी धामणेवाडीसह नजीकच्या वाड्यावस्त्यांतील ग्रामस्थ, युवक, महिला रक्तदान करणार आहेत. यामध्ये जास्तीत जास्त ग्रामस्थांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन शैलेश धामणे, श्रीराम धामणे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सिद्धेश धामणे, सूरज धामणे व लक्ष्मण धामणे यांच्याशी संपर्क साधावा.
--------

डीबीजेत ''पदवी प्रमाणपत्र वितरण ''कार्यक्रमाचे आयोजन


चिपळूण ः येथील नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. सन२०२१-२२ या शैक्षणिक वर्षात पदवी संपादित केलेल्या कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. २ मे रोजी सकाळी ११ वा. महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये पार पडणार आहे. या कार्यक्रमाला नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य, विज्ञान, लांजा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एस. कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मंगेश तांबे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या वर्षात कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठीच आहे. या कालावधीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एस. बापट यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com