-माध्यमिक शिक्षक पतपेढीची आज निवडणूक

-माध्यमिक शिक्षक पतपेढीची आज निवडणूक

२७ (पान २ साठी)

माध्यमिक शिक्षक पतपेढीची आज निवडणूक

तीन पॅनेलमध्ये लढत ; १५ जागांसाठी ४४ उमेदवार रिंगणात

पावस, ता. २९ ः रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी लोकशाही आघाडी, विकास आघाडी, तसेच शिक्षण क्रांती अशी तीन पॅनेल समोरासमोर उभी असून एक अपक्ष उमेदवार मिळून पतपेढीच्या १५ संचालक जागांसाठी जिल्ह्यातील एकूण ४४ उमेदवार रिंगणात आहेत. रविवारी (ता. ३०) रत्नागिरी शहरातील स. रा. देसाई अध्यापक विद्यालय येथील केंद्रावर मतदान होणार आहे .
रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या दरम्याने लोकशाही आघाडीचे १५ उमेदवार ,पतपेढी विकास आघाडीचे १५ उमेदवार आणि स्व. रामनाथ मोते शिक्षण क्रांतीचे १३ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. तीन पॅनेलने आपले सक्षम उमेदवार पतपेढी निवडणूकीत उतरवले असून रत्नागिरीतील सुनील जोपळे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. पतपेढीच्या १५ जागांसाठी तीन पॅनेलचे एकूण ४३ आणि १ एक अपक्ष मिळून ४४ उमेदवार रिंगणात आहेत. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १ मे रोजी निकाल घोषित होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com