कारिवडेत मंगळवारपासून नाट्यमहोत्सव

कारिवडेत मंगळवारपासून नाट्यमहोत्सव

कारिवडेत मंगळवारपासून नाट्यमहोत्सव
ओटवणे, ता. २९ ः श्री देव हेळेकर मंडळ कारिवडे यांच्यावतीने २ ते ६ मे या कालावधीत पाच दिवसीय दशावतार नाट्यमहोत्सवाचे आयोजन केले आहे. यात पाच निमंत्रित दशावतारी नाट्यमंडळांचा समावेश आहे. मंगळवारी (ता. २) सावरेश्वर दशावतार नाट्यमंडळ (आवेरा) यांचे ‘मलय गंधिनी’, ३ ला सिद्धेश्वर दशावतार नाट्यमंडळ (दोडामार्ग) यांचा ‘शापमुक्त’, ४ ला आजगावकर दशावतार नाट्यमंडळ (आजगाव) यांचे ‘शिर मारीले आईचे’, ५ ला जय संतोषी माता दशावतार नाट्यमंडळ (मातोंड) यांचे ‘शापित घुबड’, ६ ला बोर्डेकर दशावतार नाट्यमंडळ (दोडामार्ग) यांचे ‘देव भक्तीचा भुकेला’, असे नाट्यप्रयोग होणार आहेत. कारिवडे पेडवेवाडी शाळा नं. २ च्या रंगमंचावर होणाऱ्या या नाट्यमहोत्सवास दररोज सायंकाळी ७ वाजता प्रारंभ होणार आहे. नाट्यरसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव हेळेकर मंडळाने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com