रत्नागिरी-आंदोलनाचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांशी चर्चा करा

रत्नागिरी-आंदोलनाचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांशी चर्चा करा

आंदोलनाचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांशी चर्चा करा

खासदार राऊत; पालकमंत्री मागण्यांबाबत सकारात्मक

रत्नागिरी, ता. २९ : बारसू आंदोलनाचे प्रतिनिधित्व करणारे खऱ्या प्रतिनिधीशी शासनाने चर्चा करावी, ज्या ३४ आंदोलकांवर प्रशासकीय कामात अडथळा आणल्याचे कलम ३५३ लावले आहे, ते ताबडतोब वगळावे आणि गैरव्यवहार करून जमीन खरेदी झालेली आहे, त्याची कशी करावी, अशी मागणी आज पालकमंत्री उदय सामंत यांनी बोलावलेल्या बैठकीत केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात बारसूसंदर्भात झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते म्हणाले, पालकमंत्री उदय सामंत यांनी बारसूसंदर्भात बैठक आयोजित केली होती. याला कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, ठाकरे सेनेचे पदाधिरी उपस्थित होते. परंतु आंदोलनाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रतिनिधीला उशिरा निमंत्रण मिळाल्याने ते येऊ शकले नाहीत. पालकमंत्र्यांना विनंती केली की आंदोलनाचे खरे प्रतिनिधित्व करणाऱ्यांशी चर्चा करा. त्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली, तर सकारात्मक गोष्टी घडतील. पोलिसांनी काल आंदोलन करणाऱ्या १६४ महिलांना ताब्यात घेतले होते त्याना पहाटे सोडले; परंतु जे ३४ पुरुष पकडले आहेत, त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचे ३५३ चे कलम लावले आहे. हे कलम ताबडतोब वगळा, अशी मागणी आम्ही केली. याचा सहानुभुतीपुर्व विचार करून त्यांची सुटका करा.
नाणार येथे ज्या भूमाफियांनी जमीन खरेदी विक्री व्यवहार केले त्यामध्ये अधिकारी, काही राजकीय पुढारी असतील त्यांच्या व्यवहाराची चौकशी करा, बारसूत दहशतीचे वातावरण निर्माण करू नका, वातावरण शांत ठेवून संवाद साधा, सामंजस्याने प्रश्न हाताळण्यासाठी पोलिसी बळाचा वापर न करता लोकांच्या गावापर्यंत जा, अशा मागण्या केल्याचे विनायक राऊत यांनी सांगितले.
‘पाचही गावांतील ७० टक्के ग्रामस्थांचे समर्थन आहे, अशी अनेकांची भावना आहे. तेथील नेमकी वस्तुस्थिती निदर्शनास आणून द्या. तरच पुढचे पाऊल उचलले जाईल. आता ७० टक्के पाठिंबा आहे, असे लक्षात आले; तर ३० टक्के लोकांचे म्हणणे एकले जाणार नाही. ही जर खुली चर्चा असेल तर प्रत्येक चर्चेवेळी माध्यमांचे कॅमेरे येऊ देत, अशी मागणी आम्ही केली. आम्ही सर्व एकमेकांच्या विरोधात बोलतो. परंतु कंपनीचा चेहरा एकदातरी दाखवा, कंपनी अधिकाऱ्यांना बोलवण्याची मागणी मान्य केल्याचे राऊत यांनी सांगितले.
--------
चौकट
‘प्रकल्प नको’ असे नाही
प्रकल्प नको असा शब्द आम्ही कधी बोललो नाही. प्रकल्प हवा असेल तर स्थानिक ग्रामस्थांची संमती हवी, अशी आमची भूमिका आहे. ग्रामस्थांच्या भूमिकेबरोबर आम्ही आहोत, असे राऊत म्हणाले.
------------
चौकट-
राणे केवळ तोंडाची वाफ सोडतात
जैतापूर प्रकल्प होऊ नये म्हणून ठाकरेंनी ५०० कोटीचा सौदा केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. यावर खासदार विनायक राऊत म्हणाले, आजपर्यंत निव्वळ तोंडाची वाफ सोडण्यापलीकडे राणेंनी काही केले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com