हळवल गुरववाडी शाळेचे यश

हळवल गुरववाडी शाळेचे यश

99432
हळवल : येथील कार्यक्रमात टॅलेंट परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्‍कार संजना साटम यांनी केला.

हळवल गुरववाडी शाळेचे यश
कणकवली : युवा संदेश प्रतिष्‍ठानच्या सिंधुरत्‍न टॅलेंट परीक्षेत हळवल गुरववाडी (ता.कणकवली) शाळा क्र.३ च्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. या परीक्षेत इयत्ता दुसरीमधील गौरांग महेश राणे याने रौप्य पदक तर निर्वी अरूण राणे हिने कास्यपदक मिळविले. तसेच चौथीमधील दुर्वा गुरूप्रसाद सावंत हिनेही यश मिळविले.
प्रशालेतील या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्‍कार आज शालेय समिती अध्यक्षा संजना साटम यांच्याहस्ते झाला. यावेळी समितीच्या उपाध्यक्षा अनघा राणे, मनीषा राणे, गीतांजली सावंत, नेहा गोसावी, मंजुषा पंडित तसेच मुख्याध्यापक वर्षा सरकारे, शिक्षिका वीणा परब आदी उपस्थित होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com