विनायक राऊत

विनायक राऊत

१९ (पान ५ साठी)

लाठीमार झाला नसल्याचे सांगणे दुर्दैवी

खासदार राऊत ; हातात दगड घेऊन आलेले माफिया दिसले नाहीत का?

रत्नागिरी, ता. २९ ः राज्यातील १४ कोटी जनतेचे कुटुंबप्रमुख असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारसूमध्ये एवढे रणकंदन होऊनही म्हणतात लाठीमार झाला नाही, अश्रुधूर सोडले नाहीत, जबरदस्ती केली नाही हे ऐकून आम्ही डोक्यालाच हात लावले. मुख्यमंत्रीच जर असे सांगत असतील तर प्रशासन आणि पोलिस अधिकाऱ्यांकडून काय अपेक्षा करणार? मुख्यमंत्री पदाला हे बोलणे शोभणारे नाही, अशी खंत खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली.
शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्थानिक अधिकाऱ्यांनी अंधारात ठेवले असावे किंवा मुख्यमंत्र्यांना बातम्या बघायला वेळच मिळाला नसेल त्यामुळे त्यांनी असे वक्तव्य केले; परंतु बारसूमध्ये नेमके काय चालले आहे याची त्यांनी माहिती घेऊन स्थानिक जनतेला देणारी वक्तव्य केली पाहिजेत. बाहेरच्या लोकांमुळे आंदोलन भडकले, असा आरोप पालकमंत्री करत आहेत. स्वाभिमान पक्षाचे काही कार्यकर्ते आले होते, हे आम्ही मान्य करतो; परंतु या वेळी काही भूमाफिया पोलिसांच्या आश्रयाने हातात दगड घेऊन होते हे पालकमंत्र्यांना दिसले नाही का? त्यांनी त्याची माहिती घ्यावी, असे प्रत्युत्तरही खासदार राऊत यांनी दिले.
------
चौकट-
उद्धव ठाकरे मे महिन्यात बारसूमध्ये
बारसूमधील प्रस्तावित रिफानरी प्रकल्पाचा वाद आता चिघळू लागला आहे. कालच आंदोलकांनी पोलिस बंदोबस्त तोडून सर्व्हेचे काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अश्रुधूर आणि लाठीमारसारखे प्रकार घडले. यावरून स्थानिकांना विश्वासात घेऊन प्रकल्प करावा. रेटून नेऊ नये, ठाकरेसेना आंदोलकांच्या बरोबर आहे, अशी भूमिका ठाकरे यांनी जाहीर केली आहे. कालच्या या प्रकारानंतर उद्धव ठाकरे शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी मे महिन्यात बारसूमध्ये येणार आहेत, अशी माहिती खासदार राऊत यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com