‘पोपटपंची’ आमदाराला घरी 
बसवा ः अरुण दुधवडकर

‘पोपटपंची’ आमदाराला घरी बसवा ः अरुण दुधवडकर

99467
तळवडे ः येथे आयोजित ठाकरे शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना अरुण दुधवडकर.


‘पोपटपंची’ आमदाराला घरी
बसवा ः अरुण दुधवडकर

तळवडेत ठाकरे शिवसेनेचा मेळावा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २९ : शिवसेनेशी गद्दारी करून शिंदे गटाचा ‘पाईक’ झालेल्या सावंतवाडीच्या ‘पोपटपंची’ आमदाराला कायमचा घरी बसवा, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी आज येथे केले. कोणी कुठेही गेले तरी शिवसेनेवर कोणताही परिणाम होणार नाही. येणाऱ्या काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी प्रयत्न करा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शिवसेनेच्या माध्यमातून तळवडे येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात श्री. दुधवडकर बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब, जिल्हा समन्वयक बाळा गावडे, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, माजी जिल्हा परिषद सदस्य राजू मुळीक, युवासेना तालुका प्रमुख योगेश नाईक, महिला उपतालुकाप्रमुख भारती कासार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दुधवडकर म्हणाले, ‘‘आतापर्यंत सावंतवाडीच्या आमदाराने जनतेला गोड बोलून फसविले आहे. त्यांनी घेतलेले ‘खोके’ त्यांना लखलाभ होऊ देत. त्यांच्या गोड बोलण्याला कोणीही फसू नका. सध्याचे सरकार हुकूमशाही आणि दडपशाहीच आहे. लोकांना याची जाणीव झाली आहे. तरी सुद्धा लोकांच्या संपर्कात राहून संघटना मजबूत करा. लवकरच आपल्या महाविकास आघाडीचे सरकार येईल, याचा विश्वास बाळगा. आपली ताकद म्हणजे आपले शिवसैनिक आणि जनता आहे आणि तेच या गद्दारांना धडा शिकवतील आणि अन्यायाचा बदला घेतील.’’ यावेळी जिल्हाप्रमुख पडते, विधानसभा संपर्कप्रमुख परब, जिल्हा समन्वयक गावडे, उपजिल्हाप्रमुख कासार, तालुकाप्रमुख राऊळ यांनी संघटनात्मक बांधणी व सद्यस्थिती यावर मार्गदर्शन केले. तालुक्यात भगवा फडकण्यासाठी कशा पद्धतीने कार्य केले पाहिजे, हे सांगून गद्दारी केलेल्या आमदाराला धडा शिकवलाच पाहिजे, असे आवाहन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com