खोपी-पिंपळवाडी धरणातील दोन्ही कालवे नादुरुस्त

खोपी-पिंपळवाडी धरणातील दोन्ही कालवे नादुरुस्त

२ (पान २ साठीमेन)

- rat३०p३४.jpg-
९९६४१
खेड ः खोपी -पिंपळवाडी धरणातील पाणीसाठा.
- rat३०p३५.jpg ः
९९६४२
धरणाचे नादुरुस्त कालवे.
-

खोपी-पिंपळवाडी धरणातील दोन्ही कालवे नादुरुस्त

पाणी वापराविनाच; शेती, बागायतीची आशा ठरली फोल

सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २ ः तालुक्यातील खोपी येथील डुबी नदीवर बांधण्यात आलेल्या धरणामुळे बारमाही पिण्याचे पाणी उपलब्ध होईल आणि उन्हाळ्यात शेती व बागायती करता येईल, अशी आशा फोल ठरली आहे. या धरणाचे दोन्ही कालवे नादुरुस्त झाले असून त्यामधून पाणी गळती होत आहे. या कालव्यात पाणी सोडणेही बंद करण्यात आले आहे.
तालुक्यातील खोपी- पिंपळवाडी येथील डुबी नदीवर १९८२ मध्ये या धरणाच्या बांधकामाला सुरवात होऊन प्रत्यक्षात मे २००४ ला घळभरणी झाली. या प्रकल्पाचा एकूण पाणीसाठा २७.५९ दशलक्ष घनमीटर आहे. गेली १९ वर्षे मुबलक पाणीसाठा असतानाही केवळ शासनाच्या धोरणाबाबत आणि शेतकऱ्‍यांची कालव्याबाबतची उदासीनता यामुळे धरणातील मुबलक पाणीसाठा वापराविना पडून आहे. या धरणाला प्रत्येकी २० किमीचे दोन कालवे असून, त्यांच्या पिचिंगचे काम अद्याप अपूर्णावस्थेतच आहेत तसेच गेल्या ५० वर्षात त्यांचा वापरच नसल्याने कालव्यांची डागडुजीही करण्यात आलेली नाही. डाव्या कालव्यातंर्गत खोपी, कुळवंडी व मिर्ले तर उजव्या कालव्यातंर्गत खोपी, कुंभाड, बिजघर व मिर्लेचा काही भागासह शेतकऱ्‍यांची तब्बल १३३६ हेक्टर शेती ओलिताखाली येणार आहे; मात्र कालव्याची सध्याची काही ठिकाणची स्थिती धोकादायक असल्यामुळेच शेतकऱ्‍यांनी आधी कालव्यांचे पिचिंग पूर्ण करा मगच पाणी सोडा, या मागणीमुळे अद्याप धरणातील पाणी सोडण्यात आलेले नाही. धरणाचे दोन्ही कालवे नादुरुस्त झाले असून, पाणी गळती होत असल्याने सद्यःस्थितीत कालव्यातून पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे. यावर्षी १९ एप्रिलला अखेर धरणात १६.५० मीटर पाणीसाठा तर ९.४९ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. धरणाच्या सांडव्याचे तिन्ही गेट पूर्ण बंद केल्यास धरणात २७.५९ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा होऊ शकतो. सद्यःस्थितीत या धरणाच्या पाणीसाठ्यावर वीजनिर्मिती करणारा खासगी वीजप्रकल्प पाणीसाठा कमी झाल्याने बंद ठेवण्यात आला आहे.
--
कोट
खोपी -पिंपळवाडी धरणासाठी स्थानिक ग्रामस्थांनी अल्प मोबदला स्वीकारून जमिनी दिल्या; परंतु शासनाच्या उदासीन कारभारामुळे धरणात पाणीसाठा असूनदेखील आम्ही ते पाणी वापरू शकत नाही. कारण, २० किमीचे कालवे दिले असले तरी या कालव्याला गळती लागलेली आहे. त्यामुळे पाणी सोडल्यानंतर लगतच्या शेतजमिनी आणि घरामधून पाणी घुसून नुकसान होते. त्यामुळे पाणी सोडणे शक्य होत नाही. त्यामुळे धरण उशाला कोरड घशाला अशी आमची अवस्था झाली आहे.
---सुरेश मोरे, ग्रामस्थ, खोपी-कुंभाड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com