रखडलेल्या महामार्ग कामावर बोट

रखडलेल्या महामार्ग कामावर बोट

रखडलेल्या महामार्ग कामावर बोट

रविवारी दुचाकी रॅली; महामार्ग जनआक्रोश समितीचा निर्धार

कणकवली,ता.१४ ः मुंबई ते गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाची एक मार्गीका ३१ मे २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन शासन-प्रशासनाने दिले होते; मात्र, प्रत्यक्ष पाहणीनंतर हे काम संथगतीने सुरू असून ते तातडीने पूर्ण करण्यासाठी व शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रविवारी (ता.७) सायंकाळी चारला रायगड येथील कामोठे टोल प्लाझा ते खारपाडा टोल प्लाझा, अशी १७ किलोमीटरच्या दुचाकी रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीचा समारोप खारपाडा येथे जाहीर सभेने होणार आहे. याबाबत सोमवारी महामार्ग जनआक्रोश समितीची निर्धार सभा मुंबई दादर येथे झाली. या सभेत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
मुंबई ते गोवा या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम विविध १२ टप्प्यात सुरू आहे. या १२ टप्याची रोज व्यवस्थित माहिती मिळावी यासाठी टप्प्यानुसार, विभागनुसार, तालुका, जिल्हा व मुंबईतील विभागानुसार प्रतिनीधीची नेमणूक करण्याचा ठराव संमत करण्यात आला. तसेच मुंबईत प्रतिनिधीची निवड या सभेत करण्यात आली. समितीच्या या आंदोलनात व उपक्रमांत इतर संघटना व संस्थादेखील समन्वयाने सहभागी व्हावे, त्यासाठी ठराव घेण्यात आला. यामध्ये काही संघटनांनी पाठिंबा दर्शवीला आहे. यात रायगड मी मराठी प्रतिष्ठान, कोकण विकास युवा मंच, कोकण विकास समिती, कोकण कृती समिती, गवळी समाज सेवा संघ(रायगड-रत्नागिरी), रायगड स्वराज्य संघटना मुंबई, स्वराज्य संघटना रायगड, सिंधुदुर्ग जिल्हा रहिवाशी संघ, कोकण प्रतिष्ठान - दिवा, कोकण युवा संस्था, पनवेल एम. आर. असोसिएशन आणि पेण एम. आर. असोसिएशनचा समावेश आहे. या रॅलीची माहिती सर्व कोकणवासीयांपर्यंत पोचावी, प्रसिद्ध व्हावी या हेतूने सर्व कोकणकर आपल्या परिसरात किंवा महामार्गावर आपल्या स्वतःच्या फोटोसह बाईक रॅलीचा फलक प्रिंट करून आपआपल्या विभागात प्रदर्शित करू शकतात. फलकाचे ग्राफिक्स डिझाईन एकच असेल व समितीतर्फे दिले जाईल. यामध्ये आपण स्वतःचे छायाचित्र व नाव किंवा आपल्या संघटनेचे नाव, आपल्या व्यवसाय जाहिरात टाकू शकता. आपले आंदोलन अराजकीय असल्याने राजकीय पक्षाचे नाव नसावे, अशी विनंती समितीने केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com