23 वर्षांनी पुन्हा एकदा आठवणींची शाळा भरली

23 वर्षांनी पुन्हा एकदा आठवणींची शाळा भरली

१४ (टुडे पान ४ साठी)

- rat२p१२.jpg-
99920
रत्नागिरी ः रा. भा. शिर्के प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांनी मेळावा घेतला. त्या प्रसंगी उपस्थित माजी विद्यार्थी.

पुन्हा एकदा आठवणींची शाळा भरली

रा. भा. शिर्के प्रशाला; माजी विद्यार्थ्यांचा जल्लोष

रत्नागिरी, ता. २ ः रा. भा. शिर्के प्रशालेचे माजी विद्यार्थी तब्बल २३ वर्षानंतर भेटताच आठवणींची शाळा भरली. जल्लोष जुन्या आठवणींचा हा दहावीच्या बॅचने आयोजित या कार्यक्रमाचे निमित्त ठरले. ‘अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती’, अशा शब्दात शिक्षकांनीही आपल्या आठवणींना उजाळा दिला.
माळनाका येथील स्वयंवर मंगल कार्यालयात सर्व माजी विद्यार्थी एकत्र जमले. त्यानंतर राष्ट्रगीत, प्रार्थना आणि सुविचार असा परिपाठ झाला. निनाद तेंडुलकर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली. सुयोग मयेकर, शीतल मिरजकर, कविता कुलकर्णी, प्रसाद शेट्ये, मंदार करंबेळकर, स्वप्नील घाग यांनी मनोगते व्यक्त केली. कल्याणी वैद्य आणि अमित सोनावले यांनी कवितेतून आपली मनोगते मांडत आठवणींना उजाळा दिला. कैलास घाग याने वाढदिवसानिमित्त गरीब विद्यार्थी निधीला देणगी दिली. या वेळी बी. डी. पोवार, व्ही. डी. घैसास, एस. एन. हर्डीकर, एस. एम. कांबळे, विनय सोहनी, स्नेहा साखळकर, विनोद मयेकर, ए. एस. बागवे, कानविंदे, गुळवणी, काजरेकर, एम. के. शेलार, आर. एस. माळगे, गोखले, आर. ए. सोसायटीचे उपकार्याध्यक्ष ॲड. विजय साखळकर आणि शाळा समितीचे अध्यक्ष मनोज पाटणकर, वजरेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचा उत्तरार्ध शिर्के प्रशालेच्या रंजनमंदिरमध्ये झाला. या वेळी माजी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून जल्लोष केला. ऋचा कुलकर्णी, हृषिकेश भोसले, रूपा देशपांडे आणि युवराज पारकर यांनी बहारदार गायन करून मैफल रंगवली. वैशाली वैशंपायन हिने अफलातून नृत्य सादर केले. दुर्गेश आखाडे यांनी कोकणी माणूस संगमेश्वरी बोलीतून मांडला. कल्याणी वैद्यने कविता सादर केली. २००० च्या बॅचने सादर केलेल्या दुर्गेश आखाडे लिखित आणि दिग्दर्शित धम्माल स्किटने सर्वांना पोट धरून हसवले. या स्कीटमध्ये पवन रसाळ, युवराज पारकर, अमित गावडे, गौरव भोई, अमित सोनावले, निनाद तेंडुलकर, आदित्य सावंत, सुयोग मयेकर आणि शर्वरी बेंदरकर यांनी भूमिका केल्या. सूत्रसंचालन नीलेश केतकर, शर्वरी बेंदरकर, कल्याणी वैद्य आणि युवराज पारकर यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com