तुम्ही आंबे खा पण बाठे मला द्या

तुम्ही आंबे खा पण बाठे मला द्या

तुम्ही आंबे खा पण, बाठे मला द्या !
शौकत मुकादम; चळवळ यावर्षीही सुरू राहणार
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३०ः उन्हाळ्यात दरवर्षी लाखो आंबे पचवले जातात आणि तेवढेच बाठे कचऱ्यात किंवा रस्त्याच्या कडेला जातात. पण एका बाठ्यापासून आणखी आंबे आपण तयार करू शकतो याची जाणीव अनेकांना नाही. शौकत मुकादम यांनी ही बाब हेरली आणि शेतकरी व नगरिकांना पर्यावरणदृष्ट्या फायदेशीर ठरेल अशी आंबे लागवडीची मोहीमच सुरू केली आहे. चिपळूण पंचायत समितीचे सभापती असताना मुकादम यांनी ही मोहीम सुरू केली. मागील १५ वर्ष त्यांची ही मोहीम सुरू आहे. तुम्ही आंबे खा पण बाठे मला द्या असे त्यांच्या मोहीमेचे स्वरूप आहे.
पहिल्या वर्षी त्यांनी मिळालेल्या बाट्यातून स्वतः झाडे लावली. नंतर नागरिकांना झाडे लावण्यासाठी प्रोत्साहन दिले. गावचे सरपंच, तलाठी, पोलिस पाटील ते जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी या मोहिमेत सहभागी करून घेतला. शाळा, महाविद्यालय आणि परिचितांनी त्यांच्या उपक्रमाला सहकार्य केले. मुकादम यांनी विद्यार्थ्यांना वृक्ष लागवडीचे महत्त्व पटवून देण्यासाठी व्याख्यान देण्यास सुरवात केली. लग्न, बारसा किंवा सार्वजनिक कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले तर मुकादम शुभेच्छा देताना फुलांचे किंवा झाडांचे रोप घेवून जातात.
शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक लाभासाठी काही तरी उत्पन्न देणारे काम आवश्यक आहे. त्यांच्याकडे असलेल्या जमिनीवर जर फळांचे पीक घेतले तर त्यांना त्याचा लाभ होऊ शकतो असे मला नेहमी वाटते. आंब्याची पाठ सर्रास फेकली जाते, पण ती जर लावली तर त्याला चवीचा बहारदार आंबा येऊ शकतो हाच विचार घेऊन ही लोकांना प्रबोधन करायला सुरवात केली. सोशल मीडियावरूनही याबाबत मी माहिती दिली. त्यामुळे मुंबई, पुण्यासह विदेशातील लोकांनीही आपल्या गावाकडे बाठे पाठवले. पंधरा वर्षापूर्वी ही मोहीम सुरू केल्यानंतर अनेकांनी वृक्ष लागवड केली. यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळू लागले आहे. शेतकरी फोन करून याबाबतची माहिती देतात तेव्हा समाधान वाटते.

कोट
शेतकरी खूप हलाखीचे जीवन जगतात. त्यांच्यासाठी प्रत्येकाने काही ना काही विधायक करायला हवे. ज्यामुळे त्यांच्या जगण्याला आधार मिळेल. बेसुमार वृक्ष तोड सुरू आहे त्यामुळे पर्यावरणाची हानी होऊन महापूर येत आहे. त्यामुळे हिरवे कोकणचा मिशन माझ्यासाठी नेहमीच प्रेरक ठरला आहे. यावर्षीच्या हंगामातही मी लोकांना बाठा लागवडीसाठी प्रोत्साहन देणार आहे.
- शौकत मुकादम, पर्यावरणप्रेमी, चिपळूण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com