सावंतवाडी रेखाचित्र संघटना
तालुकाध्यक्षपदी राजू तावडे

सावंतवाडी रेखाचित्र संघटना तालुकाध्यक्षपदी राजू तावडे

99935
राजू तावडे, प्रसाद कापडोसकर

सावंतवाडी रेखाचित्र संघटना
तालुकाध्यक्षपदी राजू तावडे

सावंतवाडी ः महाराष्ट्र राज्य रेखाचित्र शाखा संघटना महाराष्ट्र-सिंधुदुर्गच्या अध्यक्षपदी राजू तावडे, तर सचिवपदी प्रसाद कापडोसकर यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. कुडाळ येथे नुकत्याच झालेल्या संघटनेच्या वार्षिक सभेत ही निवड झाली. संघटनेचे दिवंगत सभासद भरत जाधव व इतर दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली वाहून सभेची सुरुवात करण्यात आली. सचिव कापडोसकर यांनी मागील इतिवृत्त व जमा-खर्चाचे वाचन केले. अध्यक्ष तावडे यांनी आपल्या भाषणामध्ये संघटनेच्या कार्याबद्दल आढावा घेतला. यावेळी चित्रशाखेतील पदोन्नती मिळालेल्या सभासदांचा गौरव करण्यात आला. यामध्ये मकरंद देसाई, अरुणकुमार साळुंखे, वासुदेव सडवेलकर, प्रसाद कापडोसकर यांचा सत्कार करण्यात आला. संघटनेची जिल्हा कार्यकारिणी अशी ः उपाध्यक्ष रामू वडर, कोषाध्यक्ष मकरंद देसाई व कार्यकारिणी सदस्य भालचंद्र गोसावी, घनःश्याम सावंत, अरुणकुमार साळुंखे, सुहास कदम व स्नेहल बुवा. यावेळी सडवेलकर, कदम यांनी मनोगत व्यक्त केले. कापडोसकर यांनी आभार मानले.
...............
मळगावात माजी विद्यार्थी स्नेहमेळा
सावंतवाडी ः मळगाव ऐक्यवर्धक संघ, मुंबई संचलित मळगाव इंग्लिश स्कूल आयोजित मळगाव पंचक्रोशीतील सर्व माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी, मळगाव ऐक्यवर्धक संघ मुंबईचे पदाधिकारी, शिक्षक पालक संघ, माता पालक संघाच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन शुक्रवारी (ता. ५) सकाळी दहाला मळगाव हायस्कूल येथे करण्यात आले आहे. सर्व माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षणप्रेमींनी या स्नेहमेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्याध्यापक फाले यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com