‘एनएमएमएस’ परीक्षेत
परुळे विद्यामंदिरचे यश

‘एनएमएमएस’ परीक्षेत परुळे विद्यामंदिरचे यश

99938
दर्शन सामंत, नूतन आमडोसकर, नम्रता गोसावी, रुची राऊळ, शोभा मुंडये.

‘एनएमएमएस’ परीक्षेत
परुळे विद्यामंदिरचे यश

कुडाळ, ता. २ ः आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना घेण्यात आलेल्या राष्ट्रीय ‘एनएमएमएस’ परीक्षेत अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर, परुळे (ता. वेंगुर्ले) या माध्यमिक प्रशालेने उल्लेखनीय यश प्राप्त केले. प्रशालेचे १२ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन पाच विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. यावर्षीही प्रशालेने या परीक्षेतील आपल्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम ठेवली.
यामध्ये दर्शन सामंत याने सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये जिल्ह्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला. त्याने ११६ गुण मिळवून हे यश संपादन केले. नूतन आमडोसकर हिने जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत आठवा क्रमांक प्राप्त केला. याबरोबरच शोभा मुंडये, नम्रता गोसावी व रुची राऊळ यांचीही गुणवत्ता यादीत निवड झाली. याबरोबरच पियुष तोरसकर, तेजस परब, राज माडये, वैष्णवी परुळेकर, वेदांत कांबळी, प्रज्ज्वल करलकर व प्रज्ञेश कदम हे विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांना प्रशालेच्या शिक्षिका रीमा ठाकूर, महेश चव्हाण, गंगा वैद्य, सोमनाथ बागुल, अमेय देसाई, प्रभू पंचलिंग, वैशाली भांगरे व तेजश्री सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थाध्यक्ष मोहन देसाई, उपाध्यक्ष डॉ. उमाकांत सामंत, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश देसाई, मुख्याध्यापक सचिन माने आदींनी अभिनंदन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com