वेंगुर्ले रामेश्वर मंदिर परिसर
सुशोभीकरणाला सुरुवात

वेंगुर्ले रामेश्वर मंदिर परिसर सुशोभीकरणाला सुरुवात

99964
वेंगुर्ले ः रामेश्वर तलावाच्या ठिकाणी मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी श्रीफळ वाढवून कामाचा प्रारंभ केला.

वेंगुर्ले रामेश्वर मंदिर परिसर
सुशोभीकरणाला सुरुवात
वेंगुर्ले ः येथील प्रसिद्ध ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिर व परिसर सुशोभीकरणासाठी शासनाकडून निधी मंजूर झाला आहे. त्या अनुषंगाने या कार्याचा प्रारंभ महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास योजनेंतर्गत श्री रामेश्वर मंदिर व परिसर सुशोभीकरण कार्यासाठी २ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. त्यापैकी पहिल्या भागात ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून या कार्याची सुरुवात काल करण्यात आली. प्रारंभी श्री देव रामेश्वराला श्रीफळ ठेवण्यात आले. त्यानंतर तलावाच्या ठिकाणी श्रीफळ ठेवून कामाला प्रारंभ केला. यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, माजी नगरसेवक सुहास गवंडळकर, रामेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दाजी परब, सचिव रवींद्र परब, मानकरी सुनील परब, प्रताप परब, संजय परब, उमेश येरम, सुनील डुबळे आदी उपस्थित होते.
--
99957
पणदूर ः येथील संविता आश्रमाला जीवनावश्यक साहित्य देताना बांदा रोटरॅक्ट क्लबचे पदाधिकारी.

बांदा ‘रोटरॅक्ट’तर्फे संविताश्रमाला साहित्य
बांदा ः रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ, बांदाच्यावतीने पणदूर येथील संविता आश्रमाला जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. यावेळी रोटरॅक्टच्या सदस्यांनी आश्रमाविषयी माहिती व आश्रमाची दिनचर्या जाणून घेतली. रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष अक्षय मयेकर, उपाध्यक्ष संकेत वेंगुर्लेकर, सचिव अवधूत चिंदरकर, सहसचिव मिताली सावंत, खजिनदार गार्गी विर्नोडकर, मुईन खान, साईस्वरूप देसाई, अमित धोंगडे, अक्षय कोकाटे आदी उपस्थित होते. रोटरी क्लबचे राजू बिले व राजन बोभाटे उपस्थित होते. भविष्यात आश्रमाला सर्वसमावेशक भरीव मदत करण्याचे आश्वासन अध्यक्ष मयेकर यांनी यावेळी दिले.
--
नरडवे विठ्ठल मंदिरात वर्धापन दिन
कणकवली ः नरडवे (ता.कणकवली) येथील भैरव ग्रामस्थ मंडळातर्फे गावातील विठ्ठल रखुमाई मंदिराच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. विठ्ठल मंदिरात ४ आणि ५ मे रोजी हा कार्यक्रम होणार आहे. ४ मे रोजी सकाळी साडेनऊला विठ्ठल रखुमाईची पूजन पादुका पूजन, होमहवन, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी पादुका पालखी मिरवणूक होणार आहे. तर रात्री डबलबारी भजणाचा सामना होणार आहे. बुवा ज्ञानदेव मेस्त्री विरुद्ध बुवा दुर्वास गुरव यांच्यात भजनाचा सामना होणार असून ५ मे रोजी सकाळी नऊला अभिषेक, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी हरिपाठ, रात्री नऊ ते दहा वाजता स्थानिक भजने, त्यानंतर सत्काराचा कार्यक्रम व रात्री बाराला दशावतारी नाटक सादर होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com