संघटना बळकटीवर भर देणार

संघटना बळकटीवर भर देणार

99982
सिंधुदुर्गनगरी ः कास्ट्राईब कर्मचारी महासंघ कार्यकारिणी निवड प्रसंगी उपस्थित मान्यवर.


संघटना बळकटीवर भर देणार

‘कास्ट्राईब’ जिल्हाध्यक्ष; नूतन कार्यकारिणीसोबत चर्चा

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २ ः कास्ट्राईब कर्मचारी महासंघ सिंधुदुर्ग अंतर्गत माध्यमिक, उच्च माध्यमिक कास्ट्राईब शिक्षक व शिक्षकेतर संघटनेची जिल्हा कार्यकारिणी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम व महासचिव किशोर कदम यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्गनगरी येथील माध्यमिक पतपेढीच्या सभागृहात निवडण्यात आली. यामध्ये जिल्हाध्यक्ष संजय पेंडूरकर (कट्टा हायस्कूल), जिल्हा सचिव अभिजीत जाधव (कलंबिस्त हायस्कूल), कार्याध्यक्ष संजय जाधव (वायंगणी हायस्कूल), खजिनदार अजय गुरसाळे (खारेपाटण हायस्कूल) यांची निवड करण्यात आली. दरम्यान, संघटना बळकटीकरणावर भर देणार असल्याचे नवनियुक्त जिल्हाध्यक्षांनी सांगितले.
उर्वरित कार्यकारिणीत सहसचिव नचिकेत पवार (पोईप ज्युनिअर कॉलेज), सहसचिव रामचंद्र खाकर (कुडाळ हायस्कूल), रविकांत कदम (वेतोरे हायस्कूल), जिल्हा उपाध्यक्ष संदीप नागभीडकर (विद्यामंदिर कणकवली), किशोर यादव (हरकुळ हायस्कूल), आर. व्ही. कांबळे (डिगस हायस्कूल), नीलेश तांबे (मुटाट हायस्कूल), रमाकांत जाधव (दोडामार्ग हायस्कूल), मोहन जाधव (आरवली टांक हायस्कूल), शरद कांबळे (मांगवली हायस्कूल), सहखजिनदार नेताजी जाधव (विद्यामंदिर हायस्कूल कणकवली), जिल्हासंघटक चंद्रमणी तांबे (विजयदुर्ग हायस्कूल), मारुती कांबळे (आजगाव अध्यापक विद्यालय), बिपिन ठाकूर (टोपीवाला हायस्कूल), सुधीर तांबे (नांदगाव हायस्कूल), राजेश आव्हाड (शिरोडा हायस्कूल), नरेश कांबळे (काळसे हायस्कूल), अनिल चव्हाण (घोणसरी हायस्कूल). शिक्षकेतर संघटना जिल्हाध्यक्ष विलास वळंजू, जिल्हा महासचिव सुभाष जाधव, जिल्हा उपाध्यक्ष (फोंडा हायस्कूल), कास्ट्राईब महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मृण्मयी जाधव (तळेबाजार हायस्कूल), जिल्हा महासचिव प्रतिभा चव्हाण (आजगाव अध्यापक विद्यालय), सहसचिव दर्शना गुळवे (डॉ. एस. एस. कुडाळकर हायस्कूल), सल्लागार संदीप कदम (विद्यामंदिर हायस्कूल, कणकवली), सुहास हिंदळेकर (रेकोबा हायस्कूल), रवींद्र तांबे (शिरगाव हायस्कूल), अजितकुमार देठे (फोंडाघाट हायस्कूल), शेषकुमार नाईक (कुडाळ हायस्कूल), सुनील घस्ती (देवगड हायस्कूल), सुनील जाधव (जामसंडे हायस्कूल), जिल्हा कार्यकारणी सदस्य-विजयसिंह सातपुते (एस. एम. हायस्कूल), आनंदा कांबळे (बिडवाडी हायस्कूल), शैलेश तांबे (केळूस हायस्कूल), सुशील मंचेकर (गिर्ये हायस्कूल), ए. डी. कांबळे (करंजे हायस्कूल), नितीन जाधव (नानिवडे हायस्कूल), चंद्रकांत तांबे (नाटळ हायस्कूल), संतोष पवार (आडेली हायस्कूल), सचिन पवार (मिठबांव हायस्कूल), शरद नाईक (चेंदवण हायस्कूल), प्रकाश महाभोज (आचरा हायस्कूल), संतोष यादव (नाधवडे हायस्कूल), अनंत कदम (माउली कर्णबधिर हायस्कूल शिरोडा), सुनील काळसेकर (टोपीवाला हायस्कूल), दीपक जाधव (ओझर हायस्कूल), बुद्धभूषण हेवाळकर (विलवडे हायस्कूल), लाडू जाधव (कोलगाव हायस्कूल), राहुल समुद्रे (शिरशिंगे हायस्कूल), संदीप सावंत (कुंभवडे स्कूल), ज्योती कदम (सौंदाळे हायस्कूल), स्नेहल तांबे (घोणसरी हायस्कूल), कुमुदिनी चव्हाण (झरेबांबर हायस्कूल), अनघा कदम (आचरा हायस्कूल), साधना कदम (कोळोशी हायस्कूल), मंगल जाधव (सावडाव हायस्कूल), सुमन तांबे (हरकुळ हायस्कूल), निशाणी पेंडूरकर (टोपीवाला हायस्कूल, खासगी पसंत), श्रद्धा कुलकर्णी (पणदूर हायस्कूल), साधना न्हिवेकर (कनेडी हायस्कूल), आकांक्षा धामापूरकर (नाधवडे हायस्कूल) याप्रमाणे कास्ट्राईब शिक्षक व शिक्षकेतर संघटनेची जिल्हा कार्यकारिणी तीन वर्षांसाठी निवडण्यात आली. यावेळी कास्ट्राईब आरोग्य संघटना जिल्हाध्यक्ष संजय जाधव, कास्ट्राईब प्राथमिक संघटना जिल्हाध्यक्ष विकास वाडीकर, महासचिव मनोजकुमार आटक, कास्ट्राईब ग्रामसेवक संघटना जिल्हाध्यक्ष मंगेश साळसकर, महासचिव प्रशांत जाधव, नचिकेत पवार आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com