राज ठाकरेंच्या सभेसाठी पाहणी

राज ठाकरेंच्या सभेसाठी पाहणी

राज ठाकरेंच्या
सभेसाठी पाहणी
रत्नागिरीः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ६ मे रोजी रत्नागिरीत जाहीर सभा होणार आहे. त्याच्या तयारीसाठी मनसे उपाध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख सतीश नारकर यांनी (कै.) प्रमोद महाजन क्रीडांगणाची पाहणी केली. राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कोकणातील ही सभा चर्चेचा विषय ठरली आहे. सभेला कोकणातील पाचही जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. हे लक्षात घेऊन सभेपूर्वीच्या तयारीची पाहणी करण्यासाठी नारकर हे रत्नागिरीत आले होते. स्थानिक पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी मैदानावर जाऊन पाहणी केली. सभेचे व्यासपीठ, सभेला येणाऱ्यांची बैठक व्यवस्था यांसह वाहनतळ अशा गोष्टींबाबत नारकर यांनी कार्यकर्त्यांना सूचनाही दिल्या आहेत. महावितरणपासून ते आरटीओपर्यंतकडून मिळणाऱ्या सर्व आवश्यक परवानग्या घेतल्या आहेत, असे नारकर यांनी सांगितले.
-------
लोकशाही आघाडीकडे
पतपेढीची चावी
रत्नागिरीः जिल्हा माध्यमिक पतपेढीच्या निवडणुकीत सत्तापालट करण्यात लोकशाही आघाडीला यश आले आहे. पतपेढी विकास आघाडीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना पराभूत करत लोकशाही आघाडीने सत्तेची चावी हाती घेतली आहे. रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी लोकशाही आघाडी विकास आघाडी तसेच शिक्षणक्रांती अशी तीन पॅनेल एकमेकांसमोर उभी ठाकली होती. १५ संचालकांच्या जागांसाठी ४४ उमेदवार रिंगणात होते. रविवारी (ता. ३०) झालेल्या मतदानानंतर सोमवारी (ता. १) मतमोजणी झाली. यात लोकशाही आघाडीचे सर्वच्या सर्व १५ उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. लोकशाही आघाडीला चावी हे निवडणूक चिन्ह देण्यात आले होते. त्यामुळे आता सत्तेची चावी या आघाडीकडे आल्याचे म्हटले जात आहे. गेली साडेसहा वर्षे पतपेढीवर पतपेढी विकास आघाडीची सत्ता होती. या निवडणुकीत लोकशाही आघाडीचे सागर पाटील, धनाजी गिरी, रवींद्र हारावडे, विलास शिंदे, केदार केसरकर, विजय वनगे, हिरालाल चवरे, बिपिन मोहिते, सुभाष सेकासन, दिनेश वेताळे, आशाराणी गावडे, मुनव्वर तांबोळी, प्रदीप वाघोडे, संजय अवेरे, किशोर नागरगोजे हे विजयी झाले.
---------
चिपळुण येथे
सीतानवमी उत्साहात
चिपळूणः विश्व हिंदू परिषद चिपळूण मातृशक्ती आयामाअंतर्गत सीतानवमी कार्यक्रमात उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरवात देवी एकविरा आईला वहाळकर यांच्या हस्ते श्रीफळ ठेवून आणि भारतमाता, सीतामाईंच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर ओंकार, एकात्मता मंत्र आणि १३ वेळा विजयमंत्र आणि त्यानंतर प्रखंड मंत्री साईनाथ कपडेकर यांनी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यासंबधी माहिती दिली. श्रद्धा चितळे यांनी वहाळकर यांच्याबद्दल माहिती दिली. त्यानंतर अंजली वहाळकर यांनी सीतामाईंच्या बाबतीत अनेक घटनांवर आवश्यक तेथे पद्यातही मंत्रमुग्ध करणारे विचार मांडले. उत्तर रत्नागिरी जिल्हामंत्री उदय चितळे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com