भिडे गुरुजींचा गोगटे महाविद्यालयाला सत्कार

भिडे गुरुजींचा गोगटे महाविद्यालयाला सत्कार

३६ (टुडे पान २ साठी)


-rat२p३१.jpg-
९९९६०
रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात बोलताना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी. सोबत शिल्पा पटवर्धन, डॉ. पी. पी. कुलकर्णी, डॉ. चित्रा गोस्वामी.
-------------
भिडे गुरुजींचा गोगटे महाविद्यालयात सत्कार

रत्नागिरी, ता. २ : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक व प्रमुख संभाजी भिडे गुरुजी यांनी गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाला नुकतीच सदिच्छा भेट दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी र. ए. संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन यांच्या हस्ते भिडे गुरुजी यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि श्रीफळ, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्र. प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी केले.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना भिडे गुरुजी म्हणाले, नैतिकता हा समकाळात महत्वाचा कळीचा मुद्दा बनला आहे. स्त्रिया भारतमातेचे एक मूर्तिमंत प्रतिक, रूप असून, आपण सर्वांनी स्त्रियांचा सन्मान, आदर केला पाहिजे. अभ्यासक्रमात संस्कृत भाषा आणि मराठा साम्राज्याचा इतिहास शिकणे आवश्यक असून, भारत देशाला राष्ट्र म्हणून टिकायचे असेल तर या दोन्ही गोष्टींची नितांत गरज आहे.
कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन म्हणाल्या, एखादा माणूस आपले वय, प्रकृती इ. चा विचार न करता अत्यंत निग्रहाने किती काम करतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझे मामा म्हणजेच भिडे गुरुजी हे आहेत. तरुणांना व्यायामाची सवय लागावी, त्यांच्यात व्यायामाची आवड निर्माण व्हावी म्हणून दररोज सकाळी सांगलीच्या घाटावर जाऊन १०८ सूर्यनमस्कार घालताना मी गुरुजींना पाहिले आहे. या वेळी प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. चिंतामणी दामले उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com