संगमेश्वर ः बावनदीतील गाळ उपसा रखडला, ग्रामस्थांमध्ये नाराजी

संगमेश्वर ः बावनदीतील गाळ उपसा रखडला, ग्रामस्थांमध्ये नाराजी

rat2p2.jpg
99890
संगमेश्वरः बावनदीतील गाळ उपसा थांबला असून मशिनरी पात्राबाहेर आणली आहे.
--------------
बावनदीतील गाळ उपसा
रखडला, ग्रामस्थांमध्ये नाराजी
नियोजन शून्य कारभार; पुराचा धोका जैसे थे, जेसीबी पात्राबाहेर उभे
संगमेश्वर, ता. २ः गेले दोन महिने संगमेश्वर शास्त्री, सोनवी नदीतील गाळ उपसा सुरू होता; मात्र त्यानंतर बावनदीच्या मुख्य पात्रातील गाळ उपसा करण्याचे काम सुरू झाल्याने व त्याचे नियोजन नसल्याने पुन्हा गाळ नदीमध्ये जाऊन पुराचा धोका कायम असल्याचे चित्र दिसत असून गाळ उपसाही रखडल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
संगमेश्वरजवळच्या शास्त्री, सोनवी नदीत साचलेल्या गाळ उपशामुळे गेली अनेक वर्षे संगमेश्वर बाजारपेठेला पुराचा धोका होत आहे. त्यामुळे नद्यांमधील गाळ उपसा करावा, अशी मागणी करण्यात येत होती. संगमेश्वरजवळच्या रामपेठ येथे सुरवातीला गाळ उपसा करण्यात आला. नंतर सोनवी नदीमध्ये गाळ उपसा करण्यासाठी आलेले डंपर व्यवस्थित काम करत नसल्याचे ग्रामस्थांना समजल्यानंतर ग्रामस्थांनी तक्रार केली होती. त्यामुळे पाटबंधारे विभागाने याबाबत लक्ष घालून डंपरचालक तसेच इतर काम व्यवस्थित करण्याचे आश्वासन दिले होते; मात्र माभळे येथे काम करत असताना कर्मचाऱ्यांच्या कामात अनेक त्रुटी आढळत आहेत. पुरेशी खोदाई न करता करण्यात येत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे तसेच गाळ उपसा थातरमातूर करून नदीपात्राजवळ टाकला जात आहे.
मुसळधार पावसामुळे हा गाळ कोणत्याही नदीमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गाळ उपसा करूनही काही उपयोग होत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. माभळे गणपती विसर्जन घाट या ठिकाणी व्यवस्थित काम होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गाळ उपसा करण्यासाठी आणलेली सामुग्री भरतीच्या पाण्यामुळे वरतीच ठेवण्यात आल्याने गेले चार ते पाच दिवस गाळ उपसा रखडलेला आहे. गाळ उपशाला योग्य नियोजन नसल्याने संगमेश्वर बाजारपेठेतून नाराजी व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com