लोकअदालतीत तब्बल २ कोटीहून अधिक वसुली

लोकअदालतीत तब्बल २ कोटीहून अधिक वसुली

00014
सिंधुदुर्गनगरी ः जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत मध्ये तडजोडीने प्रकरणे मिटविताना न्यायाधीश व अन्य.

लोकअदालतीत तब्बल २ कोटीहून अधिक वसुली

८७७ प्रकरणे निकाली; जिल्हा न्यायालयसह तालुका न्यायालयांत सुनावणी

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २ ः सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांनी ठरवुन दिलेल्या वेळापत्रकानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग व तालुका विधी सेवा समितीतर्फे नुकतेच जिल्हा न्यायालय व तालुका न्यायालयांमध्ये २०२३ या वर्षातील दुसरी राष्ट्रीय लोकअदालत झाली. यावेळी एकूण ९४४५ प्रकरणांपैकी ८७७ प्रकरणे तडजोडीने निकाली होऊन एकूण २ कोटी १२ लाख ७४ हजार २१५ रुपये वसुली झाली.
सिंधुदुर्ग जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्गचे अध्यक्ष एस. जे. भारुका यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्गचे सचिव तथा वरिष्ठ न्यायाधीश डी. बी. म्हालटकर यांच्या देखरेखीखाली जिल्हा व सत्र न्यायालय सिंधुदुर्ग येथे दोन पॅनेल्स बनवली होती. पॅनेल क्रमांक १ हे जिल्हा न्यायाधीश २ व सहायक सत्र न्यायाधीश सिंधुदुर्ग यांचे न्यायदान कक्षात होते. याचे प्रमुख म्हणून जिल्हा न्यायाधीश वर्ग २ व सहाय्यक सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांची नेमणूक केली होती. पॅनेल सदस्य म्हणून विधीज्ञ यतिश खानोलकर होते. या पॅनेलमध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सिंधुदुर्ग यांचे न्यायालयातील, जिल्हा न्यायाधीश- १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश सिंधुदुर्ग यांचे न्यायालयातील व जिल्हा न्यायाधीश -२ व सहायक सत्र न्यायाधीश सिंधुदुर्ग यांचे न्यायालयातील तडजोड होवु शकतील अशी प्रकरणे ठेवली होती. यामध्ये फौजदारी अपील, मोटर अपघात क्लेमची प्रकरणे, नियमित दरखास्त प्रकरणे, दिवाणी अपील अशी एकूण ५०३ प्रकरणे होती.
पॅनेल क्रमांक २ हे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सिंधुदुर्ग तथा मुख्य न्यायदंडाधिकारी सिंधुदुर्ग यांचे न्यायदान कक्षात ठेवले होते. या पॅनेलमध्ये दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर सिंधुदुर्ग यांचे न्यायालयातील, मुख्य न्यायदंडाधिकारी सिंधुदुर्ग यांचे न्यायालयातील, ग्राहक तक्रार निवारण आयोग सिंधुदुर्ग यांचे न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे होती. तसेच वादपुर्व प्रकरणे ज्यामध्ये बँका, वित्तीय संस्था, महावितरण कंपनी, ग्रामपंचायत, पाणीपुरवठा व पोलिस चलनांची प्रकरणे होती. प्रलंबित प्रकरणांमध्ये नियमित दिवाणी दावे, स्पेशल दिवाणी दावे, नियमित दरखास्त प्रकरणे, भुसंपादन प्रकरणे, विवाह विच्छेदन प्रकरणे, फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे, चलनक्षम दस्तऐवज कायदा येथील प्रकरणे ठेवण्यात आली होती.
लोकअदालत यशस्वी करण्यासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष एस्. जे. भारुका, जिल्हा न्यायाधीश- १ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती एस. एस. जोशी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव तथा वरिष्ठ न्यायाधीश डी. बी. म्हालटकर, जिल्हा न्यायाधीश -२ तथा सहायक सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एस्. देशमुख, सिंधुदुर्ग, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा मुख्य न्यायदंडाधिकारी ए. बी. कुरणे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच शिरस्तेदार सुनिल तांबे, विश्वनाथ परब, श्री मडवळ, अमृता हुले, वाहन चालक दिनेश खवळे, गिरीश परब, तसेच जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग सिंधुदुर्ग, बँक अधिकारी, वित्तीय संस्थाचे अधिकारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग चे अधीक्षक व्ही. डी. कदम, वरिष्ठ सहायक एस. एन. पालव, आर. जी. कानसे, कनिष्ठ लिपिक रंजना परब, चपराशी जी. डी. कदम, विधी स्वयंसेवक करुणा परब, बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत कर्मचारी गायत्री मठकर, पुजा मांजरेकर, चपराशी सिद्धेश धुरी, दशरथ सरवणकर, महादेव करंगुटकर, देवेंद्र चव्हाण यांनी योगदान दिले.
--
चौकट
प्रकरणे मिटली; महसूल वसुल
जिल्ह्यातील न्यायालयांमधील प्रलंबित प्रकरणे एकूण ३४६७ ठेवली होती व त्यापैकी २५४ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. या तडजोडीत १ कोटी ७० लाख ४५ हजार ५८ रुपये एवढी वसुली झाली. तसेच वादपुर्व प्रकरणे एकूण ५९७८ ठेवण्यात आली होती. त्यापैकी ६२३ प्रकरणे निकाली काढण्यात आली. या तडजोडीने ४२ लाख २९ हजार १५७ रुपये एवढी वसुली झाली. या लोकअदालतीमध्ये ९४४५ पैकी ८७७ प्रकरणे तडजोडीने मिटवून दोन कोटी बारा लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे पंधरा रुपये वसुली झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com