वेंगुर्लेचा विकास हाच शिवसेनेचा ध्यास

वेंगुर्लेचा विकास हाच शिवसेनेचा ध्यास

00013
वेंगुर्ले : तालुक्यातील श्रमजीवी कामगारांचा भेटवस्तू व मिठाई देऊन सन्मान करताना तालुका शिवसेना पदाधिकारी.

वेंगुर्लेचा विकास हाच शिवसेनेचा ध्यास

नितीन मांजरेकर; ५०० श्रमजीवी कामगारांचा सन्मान

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २ ः शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे सर्वसामान्यांचा, त्यांच्या कामाचा सन्मान करणारे आहेत. आपल्या भागात पर्यटनांतून रोजगार निर्मिती हे त्यांच्या विकासाचे व्हिजन आहे. तालुक्यातील ३० गावात श्री. केसरकर यांच्या माध्यमातून प्रत्येकी कमीत कमी ४ ते ५ कोटी व जास्तीत जास्त २० ते २५ कोटी रुपयांच्या विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. भविष्यात नवाबाग येथील फिशरमन व्हिलेज प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर त्या भागातील नागरिकांना तो पर्यटनदृष्ट्या फायदेशीर ठरेल, असे प्रतिपादन शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी केले.
शालेय शिक्षणमंत्री केसरकर यांच्या संकल्पनेतून वेंगुर्ले-भटवाडी येथील श्री सिद्धीविनायक मंगल कार्यालयात तालुका शिवसेनेच्यावतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील सुमारे ५०० श्रमजीवी महिला-पुरुष कामगारांचा भेटवस्तू व मिठाई देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शिवसेना जिल्हा संघटक सुनील डुबळे, शहरप्रमुख उमेश येरम, प्रवक्ते सुशील चमणकर, उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, मच्छिमार सेल प्रमुख गणपत केळुसकर, उभादांडा शाखाप्रमुख प्रकाश मोटे, उपशाखाप्रमुख शिवाजी पडवळ, महिला शहरप्रमुख श्रद्धा बाविस्कर-परब, युवासेनेचे संतोष परब, अल्पसंख्यांक शहर संघटिका शबाना शेख, प्रभाकर पडते, शाखाप्रमुख राजू परब, उपशाखाप्रमुख मनाली परब, सॅमसन फर्नांडिस, श्यामसुंदर कोळमकर, शिवाजी पडवळ, रसिका राऊळ, दाभोली उपसरपंच फिन्सुअनिता फर्नांडिस, रझालीन डिसोजा, होडावडा सरपंच रसिका केळुसकर, माया राऊळ, अरुणा परब, समाधान बांदवळकर, एकनाथ राऊळ, नरेश बोवलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
माजी नगराध्यक्ष डुबळे म्हणाले, ‘‘शिक्षणमंत्री केसरकर यांनी शहरात पर्यटनदृष्ट्या साकारलेला झुलता पुल, लाईट हाऊसकडे जाणारा बंदर येथील मार्ग व होत असलेली विकासकामे, मानसीगार्डन ते वेंगुर्ले बंदर सायकलिंग ट्रॅक यामुळे वेंगुर्ले नगरपरिषद स्वच्छतेत, सौंदर्यीकरणात राज्यात अव्वल ठरली. या महत्त्वपूर्ण पर्यटनस्थळांमुळे वेंगु्र्लेचा राज्यात व देशात नावलौकिक होईल. मंत्री केसरकर यांच्या विकासास दूरदृष्टीचे व्हिजन लाभले आहे.’’ शिवसेना शहर प्रमुख उमेश येरम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तालुका प्रमुख मांजरेकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला व पुरुष कामगार उपस्थित होते.
...............
चौकट
‘अन्य विकासकामे लवकरच मार्गी’
शहरी व ग्रामीण भागात विकासकामे होत असताना श्रमजीवी कामगारांचा सन्मान व्हावा, अशी मंत्री केसरकर यांची संकल्पना होती. आपल्या भागातील अत्यावश्यक विकासकामांसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. नागरिकांनी सुचविलेली अन्य विकासकामे आम्ही केसरकर यांच्या माध्यमातून निश्चित पूर्णत्वास नेऊ, अशी ग्वाही शहर प्रमुख उमेश येरम यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com